मुलांचं कोरोना लसीकरण आणि बूस्टर डोसबाबत लवकरच निर्णय? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Corona Vaccination

मुलांचं कोरोना लसीकरण आणि बूस्टर डोसबाबत लवकरच निर्णय?

नवी दिल्ली : येत्या दोन आठवड्यात केंद्र सरकार कोरोना लसीकरणाबाबत (corona vaccination) दोन महत्वपूर्ण निर्णय घेण्याची शक्यता आहे. लसीकरणावरील सरकारच्या सर्वोच्च सल्लागार समितीच्या बैठकीत लहान मुलांसाठी लसीकरण (child corona vaccination) आणि कोरोना लशीच्या बूस्टर डोसबाबत (corona vaccination booster dose) राष्ट्रीय धोरण ठरविण्याची शक्यता आहे. याबाबत एनडीटीव्हीने वृत्त दिले आहे.

हेही वाचा: ''कोरोनाच्या तिसऱ्या डोसची गरज, सरकारने राष्ट्रीय धोरण लवकर जाहीर करावं''

भारतातील लसीकरणावरील राष्ट्रीय तांत्रिक सल्लागार समितीची येत्या दोन आठवड्यात बैठक होणार आहे. या बैठकीत लहान मुलांचं लसीकरण आणि बूस्टर डोसबाबत निर्णय घेतले जातील. तसेचसहव्याधी असलेल्या मुलांसाठी जानेवारीमध्ये लसीकरण सुरू होण्याची शक्यता आहे. त्यानंतर मार्चपर्यंत इतर सर्व मुलांना लस देण्यात येईल, असं या बैठकीबाबत प्रत्यक्ष माहिती असलेल्या एका व्यक्तीने एनडीटीव्हीला दिली.

काही दिवसांत कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. तसेच कोरोना लसीकरणाच्या सुरुवातीच्या दिवसात डॉक्टरांना लस देण्यात आली होती. त्यावेळी दोन्ही डोसमधील अंतर २८ दिवसांचं होतं. त्यानंतर दोन्ही डोसमधील अंतर जास्त असेल तर लशीचा प्रभाव जास्त असतो, असं सांगितलं गेलं. त्यामुळे डॉक्टरांकडून देखील कोरोनाचा तिसरा डोस देण्याची मागणी केली जात आहे. तसेच इतर काही देशांमध्ये कोरोनाच्या तिसरा डोसला मान्यता दिली आहे. त्यामुळे भारत सरकारने देखील जास्त वाट पाहू नये आणि प्रौढांसाठी देखील कोरोनाचा तिसरा डोस आवश्यक असल्याचं मत तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे.

loading image
go to top