Amit Shah and Narendra MOdi
Amit Shah and Narendra MOdi

Narendra Modi : 2024 पूर्वी भाजप पक्ष देखील फुटलेला असेल; ठाकरे गटाच्या खासदाराचा दावा

Published on

मुंबई - २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी सर्व पक्ष तयारी करत आहेत. मात्र त्याआधीच भाजपला मोठा धक्का बसला असून एआयएडीएमके पक्षाने भाजपसोबत सर्व प्रकारचे संबंध तोडण्याचा निर्णय घेतला आहे. अर्थात एआयएडीएमके पक्षाने एनडीएमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला.

Amit Shah and Narendra MOdi
Bacchu Kadu: पंकजा मुंडेंनी महाराष्ट्रात यात्रा काढली म्हणूनच त्यांच्या कारखान्यावर कारवाई; बच्चू कडूंचा खळबळजनक दावा

संजय राऊत म्हणाले की, एनडीए सध्या कमजोर आहे. ज्या एनडीएमध्ये शिवसेना आणि अकाली दल नाही, ते एनडीए नाही. शिवसेना आणि अकाली दल हे एनडीएची ताकद होते. बाकीचे आले आणि गेले. आम्ही २५ वर्षे राहिलो. केवळ एनडीएच नाही, आणखी लोक भाजपमधून जातील. एवढचं नाही, तर २०२४ आधी संपूर्ण भाजपमध्ये देखील फूट पडणार असल्याचा दावा, राऊत यांनी केला.

Amit Shah and Narendra MOdi
Bacchu Kadu: पंकजा मुंडेंनी महाराष्ट्रात यात्रा काढली म्हणूनच त्यांच्या कारखान्यावर कारवाई; बच्चू कडूंचा खळबळजनक दावा

आमदार अपात्रतेबाबत ते पुढं म्हणाले की, विधानसभा अध्यक्ष पक्षाचे आमदार आहेत आणि त्यांनी अनेकदा पक्षांतर केलेलं आहे. त्यामुळे पक्षाबद्दल जी नीतिमत्ता असते, ती तपासावी लागेल. तसेच त्यांच्यावर केवळ सर्वोच्च न्यायालयाचा दबाव असून दुसरा दबाव नाही. मात्र त्यांनी त्या आधी वकील म्हणून शपथ घेतली आहे. राहुल नार्वेकर यांच्या कार्यकाळात आम्हाला घटनेचा खून होताना दिसत असल्याचही राऊत म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com