'आम्ही गांधीजींना सोडलं नाही, मग तुम्ही कोण?

Basavaraj Bommai
Basavaraj Bommaiesakal

मंगळुरू (कर्नाटक) : न्यायालयाच्या निर्देशानुसार, बेकायदेशीर इमारतींवर कारवाई सुरु करण्यात आलीय. या अनधिकृत बांधकामाविरोधात केल्या जाणाऱ्या कारवाईमध्ये धार्मिक स्थळांचाही समावेश आहे. या मोहिमेअंतर्गत केल्या जाणाऱ्या कारवाईमुळे उजव्या विचारसरणीच्या एका नेत्याने राज्यातील तीन भाजपा नेत्यांना जीवे मारण्याची धमकी दिलीय. कर्नाटक हिंदू महासभेचे सचिव धर्मेंद सुरथकल (Dharmendra Surathkal) यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्माई (Karnataka CM Basavaraj Bommai) आणि भाजपसंदर्भात वादग्रस्त वक्तव्य केलंय. सत्ताधारी भाजपनं म्हैसूरमधील प्राचीन मंदिर पाडण्याची परवानगी देऊन हिंदूंच्या पाठीत सुरा खुपसलाय. एवढेच नाही तर, हिंदूंवरील हल्ल्यांसाठी गांधीजींना मारणं शक्य होतं, तर तुम्ही काय आहात, असंही धर्मेंद्र यांनी म्हटलंय. त्यांच्या या वक्तव्यानंतर आता त्यांना पोलिसांनी अटक केलीय.

Summary

कर्नाटक हिंदू महासभेचे सचिव धर्मेंद्र यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्माई आणि भाजपसंदर्भात वादग्रस्त वक्तव्य केले आहे.

कर्नाटक हिंदू महासभेचे सचिव धर्मेंद्र यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्माई आणि भाजपसंदर्भात वादग्रस्त वक्तव्य केलंय. सत्ताधारी भाजपने म्हैसूरमधील प्राचीन मंदिर पाडण्याची परवानगी देऊन हिंदूंच्या पाठीत सुरा खुपसला आहे. एवढेच नाही तर, हिंदूंवरील हल्ल्यांसाठी गांधीजींना मारणे शक्य होते, तर तुम्ही काय आहात, असेही धर्मेंद्र यांनी म्हटलंय. मंगळुरू पोलिसांनी धर्मेंद्र यांना कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना धमकी दिल्याच्या आरोपाखाली अटक केलीय. धर्मेंद्र यांच्याविरोधात खुद्द हिंदू महासभेच्या प्रदेशाध्यक्षांनीच तक्रार दाखल केली होती. तसेच पक्षाने त्यांना 2018 मध्येच काढून टाकले असल्याचा दावाही हिंदू महासभेनं केलाय. अटक केलेल्या धर्मेंद सुरथकल यांनी हिंदू महासभेच्यावतीने वक्तव्य करताना या बेकायदेशीर बांधकामाविरोधात सुरु करण्यात आलेल्या मोहिमेला विरोध केला होता. पत्रकार परिषदेत सुरथकल यांनी भाजपा नेत्यांवर निशाणाही साधला होता. त्यांनी मुख्यमंत्री बोम्मई, माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा आणि मंत्री शशिकला जोल्ले यांच्याविरोधात वादग्रस्त वक्तव्ये केली होती.

Basavaraj Bommai
केंद्र सरकारमुळे राज्यातील कारखाने अडचणीत

10 सप्टेंबर रोजी म्हैसूरमधील नंजगगुड परिसरामधील एक मंदिर या कारवाईअंतर्गत पाडण्याचा प्रयत्न करण्यात आला असता स्थानिकांनी त्याला विरोध केला. या प्रकरणासंदर्भात बोलताना सुरथकल यांनी वादग्रस्त वक्तव्य केलंय. “जर आम्ही हिंदूंच्या रक्षणासाठी महात्मा गांधींना मारुन टाकलं तर मुख्यमंत्री, येडियुरप्पा आणि जोले यांना काय वाटतं आम्ही त्यांना सोडून देऊ काय?, असं सुरथकल यांनी म्हटल्याचं ‘द हिंदू’ने दिलेल्या वृत्तात म्हटलंय. धर्मेंद्र म्हणाले, सत्ताधारी भाजपने म्हैसूरूमधील प्राचीन मंदिर पाडण्याची परवानगी देऊन हिंदूंच्या पाठीत सुरा भोसकला आहे आणि आता या लढाईत संघ परिवाराचा वापर करून ते आपले कृत्य लपविण्याचा प्रयत्न करत आहेत. एवढेच नाही, तर मंदिर पाडण्याविरोधात संघाच्या संघटनांची लढाई हा भाजप सरकारचे अपयश लपविण्याचा प्रयत्न आहे, असेही त्यांनी म्हटलंय.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com