
मोदी सरकारला ८ वर्षे झाल्यानिमित्त संमेलन; पंतप्रधान देणार ही भेट
केंद्रातील भाजप सरकारला ८ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त देशभरात ठिकठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. पंतप्रधान मोदी मंगळवारी (ता. ३१) शिमल्याला जाणार आहे. भाजपच्या ‘गरीब कल्याण संमेलना’त ते सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी (narendra modi) ९ वेगवेगळ्या मंत्रालयांद्वारे चालवल्या जाणाऱ्या योजनांच्या लाभार्थ्यांशी चर्चा करतील, अशी माहिती पीएमओकडून मिळाली आहे. (Event to mark 8 years of Modi government)
पीएमओच्या म्हणण्यानुसार, या संवादाद्वारे पंतप्रधान लाभार्थ्यांकडून फीडबॅक घेतील. या परिषदेला भाजपशासित राज्यांचे मुख्यमंत्री, राज्यमंत्री, खासदार, आमदारही उपस्थित राहणार आहेत. याच कार्यक्रमात पंतप्रधान मोदी ‘किसान सन्मान निधी’च्या ११व्या हप्त्याचे प्रकाशनही करणार आहेत. सुमारे १० कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात २१ हजार कोटी रुपये ट्रान्सफर (Gift) होणार आहेत.
हेही वाचा: पोलिसांना पतीच्या हत्येवरच संशय; पत्नी अस्थिकलश घेऊन पोहोचली ठाण्यात
पंतप्रधान मोदी (narendra modi) एक मोठी रॅली घेणार असून, त्यात ५० हजार लोक सहभागी होण्याची शक्यता आहे. रिज रोडवर ही रॅली काढण्यात येणार आहे. रॅलीत भाजप (Bjp) कार्यकर्त्यांसह केंद्राच्या १७ योजनांचे लाभार्थी सहभागी होणार आहेत. या वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या विधानसभा निवडणुकीची तयारी म्हणूनही या कार्यक्रमाकडे पाहिले जात आहे.
सरकारने भारताच्या संस्कृतीचे रक्षण केले
पंतप्रधान नरेंद्र मोदी (narendra modi) यांनी देशाचे राजकारण बदलले आहे. २०१४ पासून आम्ही खूप पुढे आलो आहोत. आज आपल्याकडे सक्रिय आणि प्रतिसाद देणारे सरकार आहे. सध्याच्या सरकारने भारताच्या संस्कृतीचे रक्षण केले आहे, असे प्रसारमाध्यमांशी बोलताना भाजप अध्यक्ष जेपी नड्डा म्हणाले.
Web Title: Event To Mark 8 Years Of Modi Government Prime Minister Will Give Gift
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..