पोलिसांना पतीच्या हत्येवरच संशय; पत्नी अस्थिकलश घेऊन पोहोचली ठाण्यात

One killed by Naxals in chhattisgarh
One killed by Naxals in chhattisgarhOne killed by Naxals in chhattisgarh

एक कुटुंब नक्षलवाद्यांविरोधात (Naxal) हत्येचा गुन्हा नोंदवण्यासाठी जिल्हा मुख्यालयात पोहोचले. यावेळी पोलिसांनी हत्येचा पुरावा (Evidence) मागितला. यामुळे पत्नीने पतीचे अस्थिकलश घेऊन पोलिस ठाणे गाठले. यानंतर पोलिसांनी अस्थी तपासणीसाठी पाठवली आहे. हा प्रकार छत्तीसगडमधील विजापूर जिल्ह्यातील ताररेम पोलिस ठाण्याच्याअंतर्गद येणाऱ्या वतीगुडा गावात घडला. हे संपूर्ण प्रकरण नक्षल हिंसाचाराशी संबंधित आहे. (One killed by Naxals in chhattisgarh)

मडकम आयता हे तेलंगणातील राजुनगरम येथून वट्टीगुडा या वडिलोपार्जित गावी पोहोचले होते. नक्षलवाद्यांनी त्यांचे अपहरण करून जनता दरबारात गळा आवळून हत्या केली. काका मडकम आयता यांनी २००५ मध्ये दुसरे लग्न केले होते. त्यावेळी माओवाद्यांनी विरोध केला होता. जीव वाचवण्यासाठी ते पत्नीसह तेलंगणातील राजुनगरम येथे राहायला गेले. काही वर्षांनी मडकम मूळ गावी जाऊ लागले, असे पुतण्या देवा मडकम याने सांगितले.

One killed by Naxals in chhattisgarh
मुकुल वासनिकांच्या उमेदवारीवर पृथ्वीराज चव्हाण म्हणाले...

गावातून सतत तेलंगणाला सुखरूप परत आल्याने त्यांची भीती हळूहळू काम होऊ लागली. २७ मार्च रोजी पुन्हा एकदा ते वट्टीगुडा गावी आले. मडकम आयता आणि सोबती पांडू गावात आल्याची माहिती नक्षलवाद्यांना मिळाली. नक्षलवाद्यांनी दोघांनाही ताब्यात घेतले. यानंतर नक्षलवाद्यांनी सार्वजनिक दरबार भरवला आणि मडकम आयता आणि पांडू यांची दोरीने गळा आवळून हत्या केली, असेही पुतण्या देवा मडकम याने सांगितले.

दुसऱ्या पत्नीने दिली तक्रार

हत्येमुळे घाबरलेल्या कुटुंबाने तक्रार केली नाही. मात्र, दुसरी पत्नी ज्योती हिने पोलिस ठाण्यात नक्षलवाद्यांविरोधात (Naxal) गुन्हा दाखल करण्याचा निर्णय घेत भद्राचलम गाठले. मात्र, तिला प्रकरण छत्तीसगडचे (chhattisgarh) असल्याने तिथे जाण्यास सांगितले. पत्नी विजापूरला पोहोचल्यावर पोलिसांनी मडकम आयताच्या हत्येबाबत काही पुरावे (Evidence) आणण्यास सांगितले. यामुळे पत्नी व कुटुंबीयांनी अस्थीसह विजापूर गाठले. पोलिस आता प्रकरणाचा तपास करीत आहे.

One killed by Naxals in chhattisgarh
७ वर्षीय मुलीचा मृतदेह आढळला तर आई बेशुद्ध

खून झाला की नाही याची शंका

पीडित कुटुंबाला गुन्हा दाखल करायचा आहे. मृताचे नक्षलवाद्यांनी (Naxal) अपहरण केल्याचे कुटुंबीयांना माहीत आहे. मात्र, त्याचा खून झाला की नाही, अशी शंका आल्याने कुटुंबीयांकडून अस्थी मागवण्यात आल्या आहेत. कुटुंबीयांनी दिलेली अस्थी तपासणीसाठी पाठवण्यात आली आहे. सोबतच पीडितेच्या कुटुंबीयांना पोलिस संरक्षणात ताररेम पोलिस ठाण्यात पाठवून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसही या प्रकरणाचा तपास करीत आहे, असे विजापूरचे एसपी अंजय वैष्णव म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com