आपला एक जवान मारला गेला, तर त्यांचे पाच मारा; मुख्यमंत्र्यांचा हल्लाबोल

For Every One Of Ours, Kill 5 Of Theirs Amarinder Singh On Ladakh Clash
For Every One Of Ours, Kill 5 Of Theirs Amarinder Singh On Ladakh Clash

नवी दिल्ली- पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी चीनवर जोरदार हल्लाबोल केला आहे. जर त्यांनी आपला एक जवान मारला तर त्यांचे पाच जवान मारले गेले पाहिजेत, असं म्हणत त्यांनी निशाणा साधला आहे. चीनला जशासतसं उत्तर द्या, त्यानंतरच त्यांच्याशी चर्चा करा, असंही सिंह म्हणाले आहेत. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

गालवान खोऱ्यातील भारत-चीनमध्ये झालेल्या रक्तरंजित संघर्षामुळे तणावाचे वातावरण आहे. या संघर्षामध्ये भारताचे 20 जवान शहीद झाल्याने देशात संतापाची लाट उसळली आहे. या पार्श्वभूमीवर अमरिंदर सिंह यांनी चीनला योग्य धडा शिकवला पाहिजे असं म्हटलं आहे.  1962 मध्ये भारत-चीन युद्ध शस्त्रांचा वापर न करता झालेलं नाही. त्यामुळे जवानांना शस्त्रांशिवाय जाण्यास कोणी सांगितलं याची कल्पना नाही. मात्र, सैन्य पेट्रोलिंग करताना नेहमी शस्त्र बाळगते. चिनी सैनिक पूर्ण तयारी करुन आले होते, तर भारतीय सैन्य यासाठी तयार नव्हते, असं अमरिंदर म्हणाले आहेत.
---------
पिंपरी-चिंचवडमध्ये लोकप्रतिनीधींच्याही घरात शिरलाय कोरोना; नगरसेवकांनाही लागण
---------
घाबरु नका; तुमच्यासाठी इथे नोकरी उपलब्ध आहे; राज्य शासनाचा उपक्रम
---------
सैनिकांना विना शस्त्रास्त्र का पाढवण्यात आले याचे उत्तर द्यावे लागेल. आपण पाषाण युगात नाही, तर परमाणू युगात जगत आहोत. जर ते आपला एक जवान मारणार असतील, तर आपण त्यांचे पाच मारले गेले पाहिजे. अगोदर त्यांना कठोर उत्तर द्या, त्यानंतर ते चर्चेला तयार असतील चर्चा करा, असं म्हणत सिंह यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. 

सोमवारी रात्री गालवान खोऱ्यात भारत आणि चिनच्या सैनिकांमध्ये हिंसक झटापटी झाली होती. यात भारताचे 20 जवान शहीद झाले आहेत. तर चीनचे 43 जवान मारले गेल्याची माहिती भारत सरकारकडून देण्यात आली आहे. 1967 नंतर पहिल्यांदाच या दोन्ही देशांमध्ये अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे या दोन्ही देशांमधील संबंध स्फोटक बनले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज(19 जून) सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. भारत आणि चीनमधील भविष्यातील संबंधाबाबत या बैठकीत चर्चा होणार असल्याचं सांगितलं जातंय.

भारत आणि चीनमधील वाद निवळण्यासाठी दोन्ही देशांमध्ये चर्चा सुरु आहे. मात्र, या चर्चा निष्फळ ठरत असल्याचं दिसत आहे. कारण, चीनने गालवान खोऱ्यावरील आपला दावा सोडण्यास नकार दिला आहे. तर भारताने गालवान खोरे भारतीय हद्दीत येत असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे दोन्ही देशांतील संबंध अधिक स्फोटक बनत चालले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com