राजस्थानात ईव्हीएम मशीन सापडले रस्त्यावर

वृत्तसंस्था
शनिवार, 8 डिसेंबर 2018

राजस्थानमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडल्यानंतर रस्त्यावर ईव्हीएम मशीन सापडल्याचा एक गंभीर प्रकार समोर आला आहे. निवडणूक आयोगाने या दुर्लक्षासाठी दोन निवडणूक अधिकाऱ्यांना जबाबदार धरुन त्यांना निलंबित केले आहे.

जयपूर- राजस्थानमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडल्यानंतर रस्त्यावर ईव्हीएम मशीन सापडल्याचा एक गंभीर प्रकार समोर आला आहे. निवडणूक आयोगाने या अक्षम्य दुर्लक्षासाठी दोन निवडणूक अधिकाऱ्यांना जबाबदार धरुन त्यांना निलंबित केले आहे.

अब्दुल रफीक आणि नवल सिंह पटवारी अशी निलंबित केलेल्या निवडणुक अधिकाऱ्यांची नावे आहेत. मतदान यंत्रांच्या विश्वासहर्तेबद्दल विविध राजकीय पक्षांच्या मनात संशय असताना हा प्रकार समोर आला आहे. सापडलेल्या मतदान यंत्राचा मतदानासाठी वापर झाला होता का? कि, ते राखीव होते ते अजून स्पष्ट झालेले नाही.

राजस्थानच्या बारन जिल्ह्यातील किशनगंज विधानसभा मतदारसंघातील शाहाबाद भागात ही घटना घडली आहे. मतदानासाठी वापरण्यात आलेले हे मतदान यंत्र होते. ते वाहुतुकीदरम्यान ट्रकमधून रस्त्यावर पडले असावे असा अंदाज जिल्हाधिकारी एस.पी.सिंह यांनी यावेळी व्यक्त केला आहे. 

दरम्यान, राजस्थानमध्ये शुक्रवारी विधानसभेच्या 200 पैकी 199 जागांसाठी मतदान झाले. मतदानासाठी 52 हजार मतदान केंद्रे उभारण्यात आली होती. मतदानासाठी 2 लाख मतदान यंत्रे आणि व्हीव्हीपॅट मशीन्सचा वापर करण्यात आला आहे.

Web Title: EVM found lying on road 2 officials suspended