'ईव्हीएम' हॅकेथॉन आज होणार

वृत्तसंस्था
शनिवार, 3 जून 2017

नवी दिल्ली : इलेक्‍ट्रॉनिक मतदान यंत्राच्या पडताळणीसाठी उद्या (ता.3) रोजी घेतली जाणारी हॅकेथॉन पूर्वनियोजित वेळापत्रकानुसारच होणार असल्याचे आज निवडणूक आयोगाने जाहीर केले.

या हॅकेथॉनच्या घटनात्मक वैधतेला आव्हान देणारी याचिका उत्तराखंड उच्च न्यायालयाने फेटाळून लावल्याने तिचा मार्ग मोकळा झाला आहे.

ईव्हीएममधील कथित फेरफारप्रकरणी आदळआपट करणाऱ्या आम आदमी पक्षाने ऐनवेळी पळ काढल्यानंतर आता हे यंत्र हॅक करण्याचे आव्हान राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाने स्वीकारले आहे. हॅकेथॉन दरम्यान दोन्ही राजकीय पक्षांना दोन वेगळ्या खोल्या उपलब्ध करू दिल्या जाणार असून, सकाळी 10 ते दुपारी 2 च्या दरम्यान ही हॅकेथॉन घेतली जाईल.

Web Title: evm hackathon voting machine hacking