
Ram Mandir Latest Updates in Marathi : अयोध्येतील बाबरी मशिदीच्या जागेचा वाद सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर निकाली निघाल्यानंतर त्या जागी उभ्या राहिलेल्या भव्य राम मंदिराचं उद्घाटन आणि त्यात रामलल्लाच्या मुर्तीची प्रतिष्ठापणा जानेवारी महिन्यात झाली होती. त्यानंतर वर्षभर मंदिर परिसरातील इतर काम सुरु होती.
पण आता ही काम पूर्णत्वाजवळ आली आहेत. यामध्ये मुख्य रामलल्लाच्या मंदिराचा दहा फुटाचा कळस हा सोन्यानं मढवला जाणार आहे. तसंच कधीपर्यंत संपूर्ण मंदिराचं काम पूर्ण होईल याची माहिती राम मंदिर निर्माण समितीचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्रा यांनी दिली आहे.