EWS आरक्षणाचे काय होणार? वैधतेबाबतच्या सुनावणीला उद्यापासून सुरूवात | EWS Reservation | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

EWS reservation hearing will start from tomorrow in the Supreme Court

EWS आरक्षणाचे काय होणार? वैधतेबाबतच्या सुनावणीला उद्यापासून सुरूवात

केंद्र सरकारने दिलेल्या १० टक्के आर्थिक आरक्षणाच्या वैधतेवर सर्वोच्च न्यायालयात उद्यापासून सुनावणी सुरू होणार आहे. यासाठी पाच दिवस कोर्टाकडून निश्चित करण्यात आले आहेत, यादरम्यान राज्यांना देखील आपली बाजू मांडण्याची संधी देण्यात येणार आहे. त्यामुळे हे आर्थिक आरक्षण टिकणार का हे पाहावे लागणार आहे. या प्रकरणाच्या सुनावणीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.

‘आर्थिकदृष्ट्या मागास घटकांना (ईडब्लूएस) प्रवेश आणि नोकऱ्यांमध्ये दहा टक्के आरक्षण देण्याच्या केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयाची आधी घटनात्मक वैधता पडताळून पाहण्यात येईल,’ असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले होते.

दरम्यान उद्यापासून या सुनावणीला सुरूवात होत आहे, उद्यापासून पाच दिवस कोर्टाने या सुनावणीसाठी राखीव ठेवले आहेत. हे केंद्राने दिलेले इकॉनॉमिकली विकर सेक्शन(EWS) साठीचे आरक्षण घटनात्मकरित्या वैधआहे का याबद्दल निर्णय होणार आहेत. आरक्षण हे सामाजिक बाबतीत दिले जाते त्यामुळे आर्थिक निकषांवर देण्यात आलेलं हे आरक्षण वैध आहे का याचा निर्णय कोर्टात होणार आहे. हे आरक्षण कसं वैध आहे ते सांगण्याचा प्रयत्न केंद्र सरकारकडून करण्यात येणार आहे. याची सुनावणी तात्काळ घेण्यात यावी यासाठी जलद घटनापीठ तयार करण्यात आले आहे. त्या घटनापीठासमोर ही सुनावणी होणार आहे.

हेही वाचा: शाओमी फोनच्या स्फोटामुळे महिलेचा मृत्यू? यूट्यूबरने शेअर केले धक्कादायक फोटो

केंद्र सरकारकडून जे आरक्षण देण्यात आलं आहे, त्यामध्ये वेगवेगळ्या राज्यामध्ये वेगवेगळी परिस्थिती आहे, त्याबाबत राज्यांकडून त्यांची बाजू मांडण्यात येणार आहे. दरम्यान उच्च शिक्षण आणि नोकरीमध्ये केंद्र सरकारने आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील (EWS) उमेदवारांसाठी दिलेल्या 10 टक्के आरक्षणाचे भवितव्य आता येत्या काही दिवसांमध्ये सर्वोच्च न्यायालयात ठरणार आहे. ईडब्ल्यूएस (EWS) कोट्याच्या संवैधानिक वैधतेला आव्हान देण्यात आल्यानंतर सुप्रिम कोर्टात ही सुनावणी होणार आहे

हेही वाचा: iOS 16 Update मध्ये कोणते फीचर्स मिळणार, येथे जाणून घ्या सविस्तर

Web Title: Ews Reservation Hearing Will Start From Tomorrow In The Supreme Court

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Supreme Court