शाओमी फोनच्या स्फोटामुळे महिलेचा मृत्यू? यूट्यूबरने शेअर केले धक्कादायक फोटो

redmi 6a explosion allegedly kills a women in delhi ncr claims youtuber shared photos
redmi 6a explosion allegedly kills a women in delhi ncr claims youtuber shared photos

स्मार्टफोनमध्ये आग किंवा स्फोट होण्याची घटना अघूनमधून समोर येत असतात, यानंतर संबंधीत कंपन्या त्या प्रकाराची चौकशी देखील करतात अशा बातम्या देखील आपण वाचतो. दरम्यान आता Xiaomi च्या फोनमध्ये झालेल्या स्फोटामुळे एका महिलेचा मृत्यू झाल्याचा दावा करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. हा दावा मनजीत नावाच्या युट्युबरने केला आहे, त्याचे म्हणणे आहे की, फोन उशीखाली ठेवून झोपलेल्या महिलेचा Xiaomi Redmi 6A फोनमध्ये झालेल्या स्फोटामुळे मृत्यू झाला. दरम्यान फोन कंपनीने आरोपाला उत्तर दिले असून या प्रकरणाची चौकशी सुरू आहे.

MD Talk YT नावाने यूट्यूब चॅनल चालवणाऱ्या मनजीतने त्याच्या ट्विटर अकाऊंटवर स्फोटानंतर फोनचे फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये हा डिव्हाइस पूर्णपणे जळालेला दिसत आहे. त्याने ट्विटमध्ये सांगितले आहे की, हा फोन त्यांच्या ऑटीच्या चेहऱ्याजवळ ठेवण्यात आला होता आणि त्यातील स्फोट त्यांच्या मृत्यूचे कारण बनला. रेडमी 6A मध्ये स्फोट झाल्याचे प्रकरण दिल्ली एनसीआर येथील सांगितले जात आहे आणि मनजीतचे ट्विट जवळपास 10,000 वेळा रिट्विट केले गेले आहे.

फोन स्फोटामुळे मृत्यू झाल्याचा दावा

मनजीतने गेल्या आठवड्यात झालेल्या स्फोटानंतर महिला आणि रेडमी 6A फोनचा फोटो शेअर केला आहे. त्या ट्विटमध्ये लिहिले आहे की, "काल माझी आंटी मरण पावली. ती Redmi 6A वापरत होती. त्या झोपल्या होत्या आणि त्यांनी फोन उशाला चेहऱ्याजवळ ठेवला होता, ज्याचा काही वेळा स्फोट झाला. ही आमच्यासाठी वाईट वेळ आहे. ही ब्रँडची जबाबदारी आहे आणि त्यांनी पाठिंबा दिला पाहीजे.

redmi 6a explosion allegedly kills a women in delhi ncr claims youtuber shared photos
Vivo ने भारतात लॉंच केला स्वस्त स्मार्टफोन; मिळतो 50MP चा दमदार कॅमेरा

दुसर्‍या ट्विटमध्ये युट्युबरने लिहिले की, "त्यांचे कुटुंब अतिशय साधारण आहे आणि तिचा मुलगा भारतीय सैन्यात आहे. त्यांना याबद्दल फारशी माहिती नाही. त्या त्यांचा फोन फक्त कॉल करण्यासाठी आणि YouTube पाहण्यासाठी वापरत असत. आता जर ब्रँड चूक मान्य करत नसेल आणि त्याची जबाबदारी स्विकारत नसेल तसेच कुटुंबाला न्यायासाठी संघर्ष करावा लागणार असेलत तर मग काय अर्थ आहे."

Xiaomi चे म्हणणे काय?

युट्यूबरने शेअर केलेल्या ट्विट थ्रेडला प्रतिसाद देत Xiaomi India च्या अधिकृत खात्याने प्रतिक्रिया दिली आहे, ज्यामध्ये, शाओमीमध्ये ग्राहकांची सुरक्षा आमच्यासाठी महत्त्वाची आहे आणि आम्ही अशा बाबी खूप गांभीर्याने घेतो. सध्या आमची टीम संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहे. पीडित कुटुंब आणि स्फोटामागील कारण शोधण्याचा प्रयत्न करत आहोत, असे सांगण्यात आले आहे

redmi 6a explosion allegedly kills a women in delhi ncr claims youtuber shared photos
जिओचे दररोज 1.5 GB डेटा देणारे प्लॅन; एकाच वेळी जाणून घ्या यादी

मोठ्या ब्रँडच्या स्मार्टफोनमध्ये स्फोट होण्याची ही पहिलीच घटना नाही. मात्र, फोनमध्ये स्फोट होऊन एखाद्याचा मृत्यू होण्याची ही पहिलीच वेळ असू शकतो. काही दिवसांपूर्वी वनप्लस नॉर्ड 2 मध्ये स्फोटाची अनेक प्रकरणे समोर आली आहेत. इतर कंपन्यांच्या डिव्हायसेसना आग लागण्याच्या घटनाही समोर येत आहेत. स्मार्टफोनच्या बॅटरीवर अतिउष्णतेमुळे किंवा जास्त दाबामुळे अनेकदा आग किंवा स्फोट होतो. तुमच्या स्मार्टफोनला जास्त प्रेशर येत नाही आणि सतत वापरल्यामुळे तो सेट तापमानापेक्षा जास्त गरम होऊ नये याची काळजी घेणे महत्त्वाचे आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com