अश्‍लिल चित्रफित पाहणाऱ्याला भाजपमध्ये उपमुख्यमंत्रीपद; सिध्दरामय्या यांचा आरोप

अश्‍लिल चित्रफित पाहणाऱ्याला भाजपमध्ये उपमुख्यमंत्रीपद; सिध्दरामय्या यांचा आरोप

बेळगाव - विधानसभा सभागृहात अश्‍लिल चित्रफित पाहणाऱ्यांना भाजपने उपमुख्यमंत्रीपद दिले आहे. पक्षाची त्यावरून मानसिकता दिसून येते, अशा शब्दात माजी मुख्यमंत्री सिध्दरामय्या यांनी टीका केली आहे. 

जिल्ह्यातील पूरस्थितीची आज (ता.27) पाहणी केल्यानंतर अथणीत पत्रकारांशी सिध्दरामय्या बोलत होते. भाजपची सत्ता असताना लक्ष्मण सवदी सहकारमंत्री होते. सवदीसह अन्य मंत्री चक्क सभागृहात अश्‍लिल चित्रफित पाहत असल्याचे उघडकीस आल्याने देशात खळबळ उडाली होती. सवदीसह तिघांना मंत्रीपदावरून पायउतार व्हावे लागले होते. त्याची आठवण सिध्दरामय्या यांनी करून देत भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. सवदी यांची उपमुख्यंमत्रीपदी निवड करून पक्षाची मानसिकता दाखवून दिल्याचा आरोप सिध्दरामय्या यांनी केला. 

सिध्दरामय्या पुढे म्हणाले,""आमदार उमेश कत्ती यांनी माझ्याशी संपर्क साधल्याचे खरे आहे. माझ्या डोळ्याचे ऑपरेशन झाले आहे. त्याची विचारपूस आणि प्रकृतीची चौकशी त्यांनी केली. त्याचवेळी कत्ती यांना चर्चेसाठी निमंत्रण दिले होते. पण, ते आले नाही. निलंबित आमदारांना धडा शिकविला जाईल. श्रीमंत पाटील यांनाही मतदार त्यांची जागा दाखवून देतील. शिवकुमार आणि माझ्यात कोणत्या प्रकारचे मतभेद नाहीत.'' 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com