Goregaon Fire: गोरेगाव जळीतकांडातील मृतांसाठी 2 लाख, जखमींना 50,000 नुकसान भरपाई; PM मोदींची घोषणा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करुन ही घोषणा केली आहे.
PM Modi
PM Modi

नवी दिल्ली : मुंबईतील गोरेगाव इथं पहाटे एका इमारतीच्या पार्किंगला लागलेल्या भीषण आगीत ८ जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे, तर ५१ जण जखमी झाले आहेत. यातील मृतांच्या नातेवाईकांना तसेच जखमींवर उपचारांसाठी नुकसान भरपाई जाहीर केली आहे. (ex gratia of 2 lakh from PMNRF to next of kin of each deceased and injured would be given 50,000 announcess by PM Modi)

पंतप्रधानांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे. मोदी म्हणाले, मुंबईतील गोरेगावमध्ये झालेल्या आगीच्या दुर्घटनेत जीव गमावलेल्यांप्रती मला दुःख झालं आहे. त्यांच्या कुटुंबियांप्रती माझ्या सहवेदना आहेत. जखमींनी लवकर बरे व्हावेत यासाठी मी प्रार्थना करतो असंही पतंप्रधानांनी म्हटलं आहे. (Latest Marathi News)

PM Modi
Naxalism: नक्षलवादाच्या समस्येवर तोडग्यासाठी दिल्लीत महत्वाची बैठक; CM शिंदे, फडणवीसांचीही हजेरी

मुख्यमंत्र्यांकडून ५ लाखांची मदत जाहीर

दरम्यान, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या मृतांच्या कुटुंबियांना शासनाकडून ५ लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. तसेच जखमी नागरिकांवर सरकारी खर्चाने वैद्यकीय उपचार करण्यात येतील, असंही सांगण्यात आलं आहे. (Marathi Tajya Batmya)

केसरकर, लोढा घटनास्थळी

मुख्यमंत्र्यांनी ट्विट करुन म्हटलं, "गोरेगावच्या उन्नत नगर येथील एसआरएच्या जय भवानी इमारतीला भीषण आग लागून झालेल्या दुर्घटनेत काही नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. यात काही लहान मुलांचाही समावेश आहे. ही घटना अत्यंत दुर्दैवी असून त्यात जीव गमवावा लागलेल्या नागरिकांप्रती मी माझी सहवेदना व्यक्त करतो. या आगीच्या घटनेबाबत मुंबई महानगरपालिका आयुक्त आणि पोलीस आयुक्तांकडून मी वेळोवेळी माहिती घेत असून मुंबईचे पालकमंत्री दीपक केसरकर तसेच मुंबई उपनगरांचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांना प्रत्यक्ष घटनास्थळी भेट देण्याचे निर्देश दिले आहेत"

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com