

Punjab Shocker Ex IPS Officer Amar Singh Chahal Injured After Suicide Attempt
Esakal
सायबर गुन्हेगारांनी कोट्यवधींची फसवणूक केल्यानंतर माजी आयपीएस अधिकारी अमर सिंह चहल यांनी गोळी झाडून घेत स्वत:ला संपवण्याचा प्रयत्न केला. सुरक्षा रक्षकाच्या रायफलमधून त्यांनी स्वत:वर गोळी झाडून घेतली. यात ते गंभीर जखमी झाले असून रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलंय. पोलिसांना घटनास्थळी सुसाइड नोट सापडली आहे. त्यात सायबर गुन्हेगारांनी ८.१० कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचा दावा करण्यात आलाय.