esakal | उमर खालिद करोना पॉझिटिव्ह; तिहार तुरुंगात झाली लागण

बोलून बातमी शोधा

umar khalid
उमर खालिद करोना पॉझिटिव्ह; तिहार तुरुंगात झाली लागण
sakal_logo
By
टीम ई-सकाळ

नवी दिल्ली : दिल्लीतील जवाहरलाल नेहरु युनिव्हर्सिटीचा (जेएनयू) माजी विद्यार्थी उमर खालिद याला कोरोनाची लागण झाली आहे. तिहार तुरुंगाचे महासंचालक संदीप गोयल यांनी ही माहिती दिली. कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर उमर खालीदला तुरुंगातच विलगीकरणात ठेवण्यात आलं आहे. गेल्या वर्षी त्याला दिल्ली हिंसाचारप्रकरणी अटक झाली होती, तेव्हापासून तो तिहार तुरुंगात आहे.

हेही वाचा: महिलांनो गरोदर असाल तर लस घेऊ नका; स्त्रीरोगतज्ञांचा सल्ला

‎तिहार तुरुंगातील कैद्यांपैकी सध्या २२७ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर तुरुंग अधीक्षक, तुरुंगातील दोन डॉक्टरांसह ६० पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. सध्या तिहार तुरुंगात २०,००० कैदी आहेत. यापार्श्वभूमीवर तिहार प्रशासनानं कैदी आणि त्यांच्या कुटुंबांच्या भेटी देखील रद्द केल्या आहेत.

हेही वाचा: तुमचा RT-PCR रिपोर्ट पॉझिटिव्ह आला तर काय कराल? जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला

दिल्लीत खजुरी खास भागात फेब्रुवारी २०२० मध्ये झालेल्या हिंसाचारप्रकरणी उमर खालीदला अटक झाली होती. सत्र न्यायालयानं खालीदला १५ एप्रिल रोजी जामीन मंजूर केला होता. मात्र, त्याला अद्याप दिल्ली दंगलीशी संबंधित युएपीए प्रकरणात जामीन मंजूर होणे बाकी आहे.