उदयनराजे भोसले राज्यसभेवर? भाजप नेते-अमित शहांच्या दिल्ली भेटीने चर्चांना उधाण!

सकाळ न्यूज नेटवर्क 
शुक्रवार, 14 फेब्रुवारी 2020

राज्यसभेतून ७ मराठी खासदार यावर्षी एप्रिलमध्ये निवृत्त होणार आहेत. राज्यातील सत्ता गमावलेल्या भाजपला ३ खासदार निवडून आणता येतील.

नवी दिल्ली : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्यातील काही प्रमुख भाजप नेत्यांनी शुक्रवारी (ता.१४) दिल्ली दौरा करून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

रात्री उशीरापर्यंत चाललेल्या या बैठकीत आगामी राज्यसभा व विधान परिषद निवडणुकीबाबत चर्चा झाल्याची माहिती आहे. भाजपमध्ये येऊन लोकसभा खासदारकी गमावलेले उदयनराजे भोसले यांना राज्यसभेवर आणण्यास भाजप नेतृत्वाने अनुकूलता दर्शविली आहे. 

- सावरकरांपेक्षा अण्णाभाऊ साठेंना द्या भारतरत्न : इम्तियाज जलील 

शहा यांच्या निवासस्थानी सुरू असलेल्या या बैठकीला सुधीर मुनगंटीवार यांच्यासह माजी खासदार उदयनराजे भोसले व धनंजय महाडीक हेही उपस्थित होते. राज्यातील सद्यस्थितीबरोबरच आगामी निवडणुकीांच्या संदर्भत यावेळी चर्चा झाल्याचे सूत्रांनी सांगितले.

- 'व्हॅलेन्टाइन डे'ला सचिनने जगजाहीर केलं त्याचं पहिले प्रेम!

राज्यसभेतून ७ मराठी खासदार यावर्षी एप्रिलमध्ये निवृत्त होणार आहेत. राज्यातील सत्ता गमावलेल्या भाजपला ३ खासदार निवडून आणता येतील. सत्तारूढ शिवसेना-कॉंग्रेस-राष्ट्रवादीचे ४ खासदार वरिष्ठ सभागृहात निवडून येणे निश्‍चित आहे.

- Pulwama Attack : 'मी भाग्यशाली...' वीरेंद्र सेहवागची पोस्ट होतेय व्हायरल!

उदयनराजे यांना पक्षाच्या कोट्यातून राज्यसभेवर आणण्यास भाजप नेतृत्व अनुकूल आहे. त्याचबरोबर यंदाच निवृत्त होणारे समाजकल्याण राज्यमंत्री रामदास आठवले यांनाही पुन्हा राज्यसभेवर आणणे व तसे न झाल्यास पुढच्या सहा महिन्यांत अन्य राज्यांतून त्यांना राज्यसभेवर आणणे भाजपला क्रमप्राप्त दिसत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ex MP and BJP leader Udayanraje Bhosale may get Rajyasabha ticket from BJP