esakal | Pulwama Attack : 'मी भाग्यशाली...' वीरेंद्र सेहवागची पोस्ट होतेय व्हायरल!
sakal

बोलून बातमी शोधा

Virendra-Sehwag

शहीदांच्या कुटुंबीयांच्या मदतीसाठी अनेकांनी पुढाकार घेतला. वीरेंद्र सेहवागचा टीम इंडियातील जोडीदार असलेल्या गौतम गंभीरनेही पुलवामा हल्ल्यातील शहीद जवानांच्या १०० मुलांची जबाबदारी स्वीकारली आहे.

Pulwama Attack : 'मी भाग्यशाली...' वीरेंद्र सेहवागची पोस्ट होतेय व्हायरल!

sakal_logo
By
टीम ई-सकाळ

गेल्या वर्षी १४ फेब्रुवारीला पाकिस्तानी दहशतवाद्यांनी केंद्रीय राखील पोलीस दलाच्या (सीआरपीएफच्या) ताफ्यावर हल्ला केला या घटनेस आज एक वर्ष पूर्ण झाले. जम्मू-काश्मीरच्या पुलवामा येथे झालेल्या या भ्याड हल्ल्यात सीआरपीएफचे ४० जवान शहीद झाले. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

विविध स्तरातील देशभरातील नागरिकांनी या जवानांना आदरांजली वाहिली. टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागनेही आपल्या ट्विटर अकाउंटवरून या हल्लातील शहीद जवानांना श्रद्धांजली वाहिली. या पोस्टची सध्या सोशल मीडियात खूप चर्चा होत आहे. अनेकांनी सेहवागची ही पोस्ट व्हायरल केली आहे. 

- आश्चर्य:'तो' उसेन बोल्टपेक्षा वेगानं धावतो; 9.55 सेकंदांत गाठले 100 मीटर

त्याचं कारणही विशेष आहे. पुलवामा हल्ल्यातील २ शहीद जवानांच्या मुलांना सेहवागने दत्तक घेतले आहे. ही दोन्ही मुले झज्जर येथील सेहवाग इंटरनॅशनल बोर्डिंग स्कूलमध्ये सेहवागच्या मार्गदर्शनाखाली क्रिकेटचे धडे गिरवत आहेत. सेहवागने या दोन्ही मुलांचे क्रिकेट खेळत असतानाचे फोटो शेअर करत ही माहिती दिली. 

उत्तर प्रदेशच्या इटावा येथील शहीद राम वकिल यांचा मुलगा अर्पित सिंह आणि झारखंडच्या रांची मधील शहीद विजय सोरेंग यांचा मुलगा राहुल सोरेंग हे सेहवागच्या बोर्डिंग स्कूलमध्ये शिकत आहेत. या दोघांच्या शिक्षणाचा खर्च सेहवागने उचचला आहे. 

- 'व्हॅलेन्टाइन डे'ला सचिनने जगजाहीर केलं त्याचं पहिले प्रेम!

अर्पित आणि राहुल या दोघांचे फोटो शेअर करत सेहवागने म्हटले आहे की, 'एक वर्षापूर्वी आजच्याच दिवशी आपल्या बहादूर जवानांवर भ्याड हल्ला झाला. या हल्ल्यात शहीद झालेल्या सर्व जवानांना विनम्र श्रद्धांजली. मी शेअर केलेल्या फोटोमध्ये बॅटिंग करत असलेला अर्पित सिंह आणि बॉलिंग करत असलेला राहुल सोरेंग हे पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांची मुले आहेत. पण मला सांगायला गर्व वाटतो की, हे दोघे माझ्या शाळेत शिक्षण घेत आहेत.' 

सेहवागच्या या पोस्टवर लाईक आणि कमेंटचा वर्षाव झाला आहे. त्याचा या कृतीबद्दल अनेकांनी त्याला सॅल्यूट ठोकला आहे, तर काहींनी तुमची ही कृती गौरवास्पद असून तुम्ही आमचे प्रेरणास्त्रोत आहात. 'नवाब ऑफ नजफगढ़' सेहवाग सर, तुम्ही खूप चांगले कार्य करत आहात, असे म्हटले आहे. 

- भारतीय संघाचा कर्णधार मनप्रीत जगातील सर्वोत्तम हॉकीपटू 

दरम्यान, भारतीय वायुसेनेने पाकिस्तानच्या ताब्यात असलेल्या बालाकोट येथील अतिरेक्यांच्या तळावर हल्ला करत पुलवामा हल्ल्याचा बदला घेतला होता. ही घटना घडून आज ७-८ महिन्यांचा काळ उलटला आहे. त्यानंतर पुलवामा हल्ल्यातील शहीदांच्या कुटुंबीयांच्या मदतीसाठी अनेकांनी पुढाकार घेतला. वीरेंद्र सेहवागचा टीम इंडियातील जोडीदार असलेल्या गौतम गंभीरनेही पुलवामा हल्ल्यातील शहीद जवानांच्या १०० मुलांची जबाबदारी स्वीकारली आहे.