'व्हॅलेन्टाइन डे'ला सचिनने जगजाहीर केलं त्याचं पहिले प्रेम!

टीम ई-सकाळ
Friday, 14 February 2020

ऑस्ट्रेलियाची महिला क्रिकेटपटू एलिसे पेरीच्या बॉलिंगवर त्याने बॅटिंगही केली. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर ट्रेंडिंग आहे. 

आज १४ फेब्रुवारी व्हॅलेंटाईन डे! जगभरात आजचा दिवस हा प्रेमाचा दिवस म्हणून साजरा केला जात आहे. यानिमित्ताने प्रत्येकजण आपल्या मनातील प्रेम भावना आज व्यक्त करत आहेत. याला 'गॉड ऑफ क्रिकेट' मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरही अपवाद राहिला नाही.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

सचिननेही आपल्या ट्विटर अकाउंटवरून व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने आपल्या पहिल्या प्रेमाची कबुली दिली. यावेळी एक व्हिडिओ अपलोड करत त्याने 'पहिलं प्रेम' जगजाहीर केलं. माझं पहिलं प्रेम अशी गोड कॅप्शनही त्याने या व्हिडिओला दिली आहे. या व्हिडिओमध्ये कोणतीही व्यक्ती नसून ती खास गोष्ट आहे क्रिकेट. सचिनने नेट प्रॅक्टिस दरम्यानचा हा व्हिडिओ चाहत्यांसोबत शेअर करत व्हॅलेंटाईन डेच्या शुभेच्छा दिल्या.

- भारतीय संघाचा कर्णधार मनप्रीत जगातील सर्वोत्तम हॉकीपटू  

सचिनने १६ व्या वर्षी इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये पाऊल ठेवले. आणि २४ वर्षांहून अधिक काळ क्रिकेटमध्ये आपला दबदबा कायम राखत जगभरातील क्रिकेट चाहत्यांचे मनोरंजन केले. त्याच्या नावावर १०० शतकं जमा असून धावांच्या बाबतीतही तोच टॉपर आहे. त्यामुळे त्याला 'गॉड ऑफ क्रिकेट' ही पदवीही चाहत्यांनी बहाल केली आहे. 

- ऑलिंपिक तयारीस १.३ कोटींची मंजुरी

दरम्यान, सचिन सध्या ऑस्ट्रेलियात सुटी एन्जॉय करत आहे. गेल्या रविवारी एका चॅरिटी मॅचसाठी तो तिकडे गेला होता. ऑस्ट्रेलियाच्या जंगलात लागलेल्या वनव्यामुळे मोठ्या प्रमाणावर हानी झाली. याकामी मदतनिधी उभारण्यासाठी बुशफायर चॅरिटी मॅच आयोजित करण्यात आली होती. यामध्ये रिकी पाँटिंगच्या टीमचा कोच म्हणून तो सहभागी झाला होता. 

यावेळी जवळपास साडेपाच वर्षांनंतर तो मैदानावर उतरला होता. ऑस्ट्रेलियाची महिला क्रिकेटपटू एलिसे पेरीच्या बॉलिंगवर त्याने बॅटिंगही केली. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर ट्रेंडिंग आहे. 

- 'बिझी' सौरव दादा सचिनला म्हणाला, 'तू नशीबवान आहेस मित्रा!'

यानंतर सचिन आणि वेस्ट इंडिजचा महान खेळाडू ब्रायन लारा हे रोड सेफ्टी इंटरनॅशनल टुर्नामेंटमध्ये एकमेकांविरुद्ध मैदानात उतरणार आहेत. इंडिया लिजेंड्स आणि वेस्ट इंडिज लिजेंड्स या दोन टीममध्ये ७ मार्चला मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर पहिली मॅच होणार असून २२ मार्चला ब्रेबॉर्न स्टेडियमवर शेवटची मॅच होणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sachin Tendulkar shared video of his first love on Valentine Day