आता बँकांच्या परीक्षा मराठीतही होणार

वृत्तसंस्था
गुरुवार, 4 जुलै 2019

नवी दिल्ली: आता बँकेच्या परीक्षा मराठीत होणार आहेत. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी बँकांच्या परीक्षा आता 13 भाषांमध्ये घेणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यामध्ये मराठीचाही समावेश करण्यात आला आहे. 

ग्रामीण भागातील मुलांना यामुळे मोठ्या प्रमाणावर फायदा होणार आहे. स्थानिक भाषेत परीक्षा घ्या अशी मागणी अनेक वर्षांपासून केली जात होती. दक्षिणेकडील राज्यांमधील खासदारांनी ही मागणी लावून धरली आहे. खासदारांच्या मागणीची दखल घेत मोदी सरकारने बँकांच्या परीक्षा स्थानिक भांषांमध्ये घेण्याचा निर्णय घेतला आहे. 

स्पर्धा परीक्षा किंवा बँकेच्या परीक्षा या इंग्रजी आणि हिंदी भाषेमध्ये घेतल्या जातात. मात्र या परीक्षा कन्नडमध्ये घेण्याची मागणी काँग्रेसचे राज्यसभा खासदार जी. सी. चंद्रशेखर यांनी केली. चंद्रशेखर यांनी शुन्यप्रहारादरम्यान हा प्रश्न उपस्थित केला होता. विशेष म्हणजे जी. सी. चंद्रशेखर यांनी आपली मागणी कन्नड भाषेतून मांडली होती. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Exam For Regional Rural Banks To Be Held In 13 Local Languages