उत्पादन शुल्कात कपात करा : सोनिया गांधी

उत्पादन शुल्कात कपात करा : सोनिया गांधी

नवी दिल्ली - निरंकुश आणि निष्ठुर भाजप सरकार कृषी कायद्यांद्वारे शेतकऱ्यांचे आणि इंधन दरवाढ करून मध्यमवर्गाचे कंबरडे मोडत आहे, अशी टीका काँग्रेसच्या सर्वेसर्वा सोनिया गांधी यांनी आज केली आहे. पेट्रोलियम पदार्थांवरील उत्पादन शुल्क यूपीए सरकारच्या काळात जेवढे होते तेवढे करण्यात यावे, अशी आग्रही मागणी देखील त्यांनी केली. सरकारी तेल कंपन्यांनी इंधनाचे दर वाढविण्याचा निर्णय घेतल्यामुळे  दिल्लीत पेट्रोलचे दर प्रति लिटर ८४.२० रुपयांवर गेले आहेत.

 या पार्श्वभूमीवर सोनिया गांधींनी निवेदन जारी करून सरकारवर प्रहार केला. स्वतंत्र भारताच्या इतिहासात पहिल्यांदा देश अशा वळणावर उभा आहे. एकीकडे शेतकरी न्याय्य मागण्यांसाठी ४४ दिवसांपासून दिल्लीच्या सीमेवर  आहे. दुसरीकडे निष्ठुर भाजप सरकार शेतकरी व मध्यमवर्गाचे कंबरडे मोडण्याचा प्रयत्न करत आहे, अशी टीका त्यांनी केली.  

आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेलाची किंमत कमी असताना याचा फायदा सर्वसामान्यांना देण्याऐवजी सरकारने उत्पादन शुल्कामध्ये भरमसाट वाढ करून फायदा उकळण्याचे सर्व विक्रम मोडीत काढले आहेत. मागील साडेसहा वर्षांमध्ये मोदी सरकारने अबकारी शुल्क वाढवून सर्वसामान्यांच्या खिशातून १९ लाख कोटी रुपये वसूल केले आहेत.
- सोनिया गांधी, अध्यक्ष काँग्रेस

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com