‘कलम ३७०’ हटविल्याची वर्षपूर्ती उत्साहात; पण सरपंचावर गोळीबार

जम्मू-काश्मीर महिला मोर्चाच्या उपाध्यक्ष रुमीसा रफीक जवानाला मिठाई देताना. (एएनआय)
जम्मू-काश्मीर महिला मोर्चाच्या उपाध्यक्ष रुमीसा रफीक जवानाला मिठाई देताना. (एएनआय)

श्रीनगर - जम्मू आणि काश्‍मीरला विशेष दर्जा देणारे ३७० कलम हटवण्याच्या निर्णयास आज एक वर्ष पूर्ण झाले. त्यामुळे आज सकाळी भाजपच्या नेत्या रुमिसा रफीक यांनी श्रीनगर शहरातील लाल चौक येथे तिरंगा ध्वज फडकावला. अप्रिय घटना रोखण्यासाठी काश्‍मीर खोऱ्यात सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली. श्रीनगर शहरात दोन दिवसांपासून लागू असलेली संचारबंदी आज हटविण्यात आली. मात्र कोरोनामुळे लागू केलेले निर्बंध कायम ठेवले आहेत. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

केंद्र सरकारने गेल्या पाच ऑगस्टला जम्मू काश्‍मीरमधून कलम ३७० वगळले होते. त्याचबरोबर जम्मू काश्‍मीरचे दोन केंद्रशासित प्रदेशात विभाजन करण्यात आले. यादरम्यान राज्यात निर्बंध लागू केले आणि प्रतिबंधात्मक उपाय म्हणून नॅशनल कॉन्फरन्स आणि पिपल्स डेमोक्रॅटिक पक्षाच्या प्रमुख नेत्यांसह सुमारे दोनशेहून अधिक नेत्यांना नजरकैदेत ठेवण्यात आले. यात माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला, उमर अब्दुल्ला, मेहबुबा मुफ्ती यांचा प्रामुख्याने समावेश होता. तसेच मोबाईल सेवाही बंद करण्यात आली. मात्र कालांतराने टप्प्याटप्प्यात निर्बंध शिथिल करण्यात आले.

विरोध कायम - उमर अब्दुल्ला
माजी मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी राज्यातील कलम ३७० काढण्याच्या निर्णयास विरोध कायम राहिल, असे म्हटले आहे. 

सरपंचावर गोळीबार
कुलगाम जिल्ह्यातील आखरन गावचे सरपंच आरिफ अहमद यांना दहशतवाद्यांनी गोळ्या घातल्या. त्यांच्या छातीवर जवळून गोळी घातल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यांना रुग्णालयात दाखल केले असून त्यांची प्रकृती नाजूक आहे. आरिफ हे भाजपचे सदस्य होते. यापूर्वीही दहशतवाद्यांनी काश्‍मीरमधील अन्य सरपंचावर गोळीबार केला होता. तसेच पुलवामा जिल्ह्यात दहशतवाद्याच्या हल्ल्याच्या दोन घटना घडल्या. त्यात दोन पोलिस कर्मचारी जखमी झाले.

जम्मू काश्‍मीर आणि लडाखमध्ये बदलाची प्रक्रिया सुरू आहे. काश्‍मीर खोऱ्यात सामाजिक न्याय बहाल करणे, आर्थिक दृष्ट्या मागासलेल्यांचे सशक्तीकरण आणि विकास करणे तसेच विकास योजना पुढे नेणे यावर भर दिला जात आहे. शिक्षण आणि रोजगाराच्या संधी वाढवण्याबरोबरच महिला हक्काचे संरक्षण करणे यासाठी पावले उचलली जात आहे.
- जयशंकर, पररराष्ट्रमंत्री

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com