UP Election : युपीत एक्झिट पोलवर निवडणूक आयोगाची बंदी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Political Party

UP Election : युपीत एक्झिट पोलवर निवडणूक आयोगाची बंदी

नवी दिल्ली : आगामी युपी विधानसभेपूर्वी (Assembly Election) निवडणूक आयोगाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला असून, 10 फेब्रुवारी ते 7 मार्चपर्यंत एक्झिट पोलवर (Exit Poll Ban In UP ) बंदी घातली आहे. या निर्णयामुळे प्रिंट किंवा इलेक्ट्रॉनिक मीडियावर कोणतेही एक्झिट पोल घेण्यात येणार नाहीत. 10 फेब्रुवारी रोजी सकाळी 7 ते 7 मार्च रोजी संध्याकाळी 6.30 वाजेपर्यंत ही बंदी घालण्यात आली आहे, अशी माहिती यूपीचे मुख्य निवडणूक अधिकारी अजय कुमार शुक्ला यांनी एका निवेदनाद्वारे दिली आहे. (UP Assembly Election 2022)

एक्झिट पोल छापील माध्यमांतून (Election Commission Of India) प्रसिद्ध केला जाणार नाही किंवा तो इलेक्ट्रॉनिक मीडियावरही दाखविता येणार नसून, हा नियम न पाळणाऱ्याला दोन वर्षांपर्यंत तुरुंगवास तसेच दंडही ठोठावला जाऊ शकतो. मतदानाच्या समाप्तीसाठी निश्चित केलेल्या 48 तासांच्या कालावधीतही कोणत्याही इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये कोणत्याही ओपिनियन पोल किंवा सर्वेक्षणाचे निकाल प्रदर्शित करण्यास मनाई असणार आहे.

हेही वाचा: न्यूयॉर्क टाईम्स म्हणजे 'सुपारी मीडिया'; पेगाससवर केंद्रीय मंत्र्यांचा हल्लाबोल

ओपिनियन पोल आणि एक्झिट पोलबाबत निवडणूक आयोग सुरुवातीपासूनच कडक आहे. अशा परिस्थितीत, मतदानाच्या पहिल्या टप्प्यापासून मतदानाच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत नियमानुसार, कोठेही एक्झिट पोल घेण्यात येणार नाही. या काळात कोणत्याही प्रकारचे सर्वेक्षण करण्यासही बंदी असणार आहे. उत्तर प्रदेशात सात टप्प्यात मतदान होणार असून, पहिल्या टप्प्यासाठी 10 फेब्रुवारीला मतदान होणार आहे, तर शेवटच्या टप्प्यासाठी 7 मार्चला मतदान होणार आहे. 10 मार्च रोजी निकाल जाहीर होणार आहेत. यूपीशिवाय उत्तराखंड, गोवा, पंजाब आणि मणिपूरचे निकालही 10 मार्चला जाहीर होणार आहेत.

हेही वाचा: हरलेला पैलवान कधी चावतो तर कधी...अखिलेश यादव यांचा भाजपवर हल्लाबोल

दरम्यान, सपा प्रमुख अखिलेश यादव सतत ओपिनियन पोलवर बंदी घालण्याची मागणी करत होते. याचा मतदारांवर परिणाम होऊ शकतो, असे मत अखिलेश यांनी व्यक्त केले होते. आता ठराविक कालावधीसाठी निवडणूक आयोगाने यूपी निवडणुकीच्या एक्झिट पोलवर बंदी घातली आहे.

Web Title: Exit Poll Ban By Election Commission In Up

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..