esakal | केंद्रीय मंत्रिमंडळाचा आठवड्यात विस्तार; ज्योतिरादित्य, सोनोवाल यांना संधी?
sakal

बोलून बातमी शोधा

Modi, Shah

केंद्रीय मंत्रिमंडळाचा लवकरच विस्तार; ज्योतिरादित्य, सोनेवाल यांना संधी?

sakal_logo
By
सकाळ न्यूज नेटवर्क / वृत्तसंस्था

नवी दिल्ली : केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारच्या मंत्रिमंडळात विस्तार आणि फेरबदल करण्याच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत. या आठवडाभरात हा विस्तार होऊ शकतो. विस्ताराच्या प्रक्रियेत काँग्रेसमधून आलेले ज्योतिरादित्य शिंदे (Jyotiraditya Scindia), उत्तर प्रदेशातील ब्राह्मण चेहऱ्यांपैकी रीटा बहुगुणा-जोशी (Reeta Bahuguna Joshi) आदींना मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची शक्यता आहे. तसेच आसामचे माजी मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल (Sarvanand Sonowal) यांचीही दिल्ली वापसी होण्याचे संकेत आहेत. उत्तर प्रदेशातील एखादा मंत्रीही दिल्लीत परत येऊ शकतो. (expansion of Union Cabinet may happened in a week Opportunity for Jyotiraditya Sonowal)

हेही वाचा: भ्रष्टाचाराच्या आरोपांवर 'राम मंदिर ट्रस्ट'ची पहिली प्रतिक्रिया!

पंतप्रधान मोदी व गृहमंत्री अमित शहा या दोघांनी गेले तीन-चार दिवस विविध मंत्र्यांना बोलावून त्यांच्या मंत्रालयांच्या कामांचा आढावा घेतला. भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनाही यावेळी मुद्दाम बोलावून घेण्यात आले होते. विविध मंत्रालयांच्या कामांचे पॉवर पॉइंट सादरीकरणही मोदी यांनी पाहिले व काही सूचनाही केल्या. या झाडाझडतीत ज्या मंत्र्यांचे कामकाज समाधानकारक नसल्याचे आढळेल किंवा संबंधितांची उपद्रव क्षमता जास्त असेल तर त्यांचे खाते बदलले जाईल अशा हालचाली आहेत. असे किमान ८ ते १० मंत्री मोदी यांच्या रडारवर आल्याची माहिती आहे.

हेही वाचा: ...तर काँग्रेसला आमच्या शुभेच्छा - शिवसेना

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे अर्थव्यवस्थेचे कंबरडे मोडले असताना खुद्द दिल्लीत वेगात सुरू असलेल्या २४ हजार कोटी खर्चाच्या सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पाबाबत मध्यंतरी जोरदार आरडाओरडा झाला तेव्हा संबंधितांकडून पुरेसा युक्तिवाद केला गेला नसल्याचे निरीक्षण मांडले जाते. मात्र, नगरविकास मंत्री हरदीपसिंग पुरी मंत्रिमंडळात कायम राहतील. महाराष्ट्रातून डॉ. प्रीतम मुंडे, डॉ. भारती पवार यांच्यासारख्या युवा चेहऱ्यांनाही मोदी-शहा केंद्रात संधी देऊ शकतात.

ज्येष्ठांचा ताण कमी करणार

केंद्रीय मंत्रिमंडळात सध्या ६० च्या आसपास मंत्री आहेत. प्रकाश जावडेकर, नरेंद्र तोमर यांच्यासारख्या ज्येष्ठ मंत्र्यांवर दोन-तीन मंत्रालयांची जबाबदारी आहे. विस्ताराच्या या प्रक्रियेत या मंत्र्यांवरील ताण हलका करून नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाण्याची शक्यता आहे.

संपादन - अमित उजागरे

loading image
go to top