esakal | 'काही मिनिटात 2 कोटींचा भूखंड 18 कोटींचा झाला' राम मंदिर जमीन खरेदीत घोटाळ्याचा आरोप
sakal

बोलून बातमी शोधा

ayodhya ram mandir building construction

'काही मिनिटात 2 कोटींचा भूखंड 18 कोटींचा झाला'

sakal_logo
By
अमित उजागरे

अयोध्या : राम मंदिर ट्रस्टच्या जमीन खरेदी प्रकरणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप नुकतात आम आदमी पार्टी (AAP) आणि समाजवादी पार्टी (SP) यांनी केला होता. राम मंदिर ट्रस्टनं अयोध्येत जमीन खरेदी करताना दोन कोटी रुपयांची जमीन फक्त 10 मिनिटात 18 कोटींची कशी झाली असा सवाल राज्यसभा खासदार संजय सिंह यांनी केला. दरम्यान, या आरोपांवर राम मंदिर ट्रस्टकडून पहिल्यांदाच प्रतिक्रिया देण्यात आली आहे. "आम्ही अशा आरोपांकडं लक्ष देत नाही", अशा शब्दांत विश्व हिंदू परिषदेचे उपाध्यक्ष आणि राम मंदिर ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांनी म्हटलं आहे. टाइम्सनाऊ न्यूजनं याबाबत वृत्त दिलं आहे. (Ram Mandir Trust first reaction to allegations of land purchase)

हेही वाचा: "राहुल गांधींनी ठाकरेंना पेट्रोलवरील कर कमी करायला सांगावं"

राय म्हणाले, "लोक गेल्या १०० वर्षांपासून आमच्यावर आरोप लावत आहेत. यापूर्वी महात्मा गांधींची हत्या केल्याचा आरोपही आमच्यावर करण्यात आला होता. त्यामुळं आम्ही अशा आरोपांकडं लक्ष देत नाही. तर आरोपांचा आम्ही अभ्यास करतो आणि मगच त्यावर प्रतिक्रिया देतो."

हेही वाचा: ...तर काँग्रेसला आमच्या शुभेच्छा - शिवसेना

आपचे राज्यसभा खासदार संजय सिंह यांनी यासंदर्भात आरोप करताना म्हटलं होतं की, "राम मंदिर ट्रस्टनं अयोध्यत २ कोटी रुपयांची जमीन १८.५ कोटी रुपयांना विकत घेतली. पण केवळ १० मिनिटांत जमिनीची किंमत १० पट कशी वाढली? असा सवालही त्यांनी केला होता. या जमिनीच्या नोंदणीत तिची किंमत २ कोटी रुपये दाखवण्यात आली आहे. मात्र, विक्रेत्याला १६.५ कोटी रुपये देण्यात आले होते. हे व्यवहार चंपत राय यांच्या आदेशाने करण्यात आले. तर ट्रस्टचे सदस्य अनिल मिश्रा आणि अयोध्याचे महापौर ऋषिकेश उपाध्याय हे रजिस्ट्रार कार्यालयात साक्षीदार म्हणून उपस्थित होते, असा गंभीर आरोपही संजय सिंह यांनी केला आहे. त्यामुळे या प्रकरणी सीबीय आणि ईडी मार्फत चौकशी करण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी केली होती.

पाच एकर जागेत होणार राम मंदिर

अयोध्येत पाच एकर जमिनीवर राम मंदिर बांधलं जाणार आहे. तर उरलेल्या १०० एकर जागेमध्ये विविध सुविधा उभारण्यात येणार आहेत. यामध्ये संग्रहालय, पुस्तकालय, यज्ञशाळा आणि प्रभू रामाच्या जीवनातील विविध प्रसंगावर आधारित फोटो गॅलरी उभारण्यात येणार आहे.

"निधीचा कुठे वापर होतोय हे कळायला हवं"

दरम्यान, कर्नाटक विधानसभेतील विरोधीपक्ष नेते सिद्धरामय्या यांनी फेब्रुवारीमध्ये म्हटलं होतं की, "केवळ मीच नव्हे तर प्रत्येक नागरिकाला हे जाणून घेण्याचा हक्क आहे की, अयोध्येतील राम मंदिराच्या उभारणीसाठी गोळा केलेला निधी कुठे वापरला जात आहे." दरम्यान, विश्व हिंदू परिषदेनं २१०० कोटी रुपयांचा निधी जमवत "समर्पण निधी अभियाना'ची २७ फेब्रुवारी रोजी सांगता केली होती.

loading image
go to top