esakal | ...तर काँग्रेसला आमच्या शुभेच्छा - शिवसेना
sakal

बोलून बातमी शोधा

Priyanka Chaturvedi

...तर काँग्रेसला आमच्या शुभेच्छा - शिवसेना

sakal_logo
By
अमित उजागरे

मुंबई : काँग्रेस स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व निवडणुका तसेच विधानसभा निवडणूकही स्वतंत्रपणे लढवेल, असं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी नुकतचं जाहीर केलं. त्यांच्या या विधानावर शिवसेनेच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. "जर काँग्रेसनं एकट्यानं लढण्याचा निर्णय घेतला असेल तर आम्ही केवळ त्यांना शुभेच्छाच देऊ शकतो," असं चतुर्वेदी यांनी म्हटलंय. (So our best wishes to Congress Shiv Sena replied to Nana Patole)

हेही वाचा: 'तेव्हापासून ज्वलंत हिंदुत्व खुंटीला टांगलंय'; शिवसेनेवर टीका

चतुर्वेदी म्हणाल्या, "नाना पटोले हे राज्यातील महाविकास आघाडी सरकारचा महत्वाचा भाग आहेत. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेनं आणि आघाडीनं जनतेची मनं जिंकण्यात यशस्वी ठरले आहेत. पण भविष्यात राज्यातील निवडुका कशा पद्धतीनं लढवायच्या याबाबत काँग्रेसचे नेते ठरवतील. पण महाराष्ट्र सरकार म्हणून आम्ही आघाडी म्हणून सोबत राहू आणि महाराष्ट्रातील जनतेची सेवा करु." टाइम्स नाउ या वृत्तवाहिनीशी प्रियंका चतुर्वेदी बोलत होत्या.

हेही वाचा: "राहुल गांधींनी ठाकरेंना पेट्रोलवरील कर कमी करायला सांगावं"

दरम्यान, शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी देखील नाना पटोले यांच्या विधानावर प्रतिक्रिया देताना म्हटलं की, आपला पक्ष वाढवण्यासाठी आणि मजबूत करण्यासाठी सर्वजण मुक्त आहेत. सध्या राज्यात तीन पक्षांचं एकत्रिकरण झालेलं नाही. तर तीन पक्षांमध्ये युती झालेली आहे. त्यामुळं या पक्षांनी एकमेकांना असं कोणतंही वचन दिलेलं नाही के ते प्रत्येक निवडणूक एकत्रचं लढतील. स्थानिक निवडणुकांसाठी स्थानिक पातळीवरील नेते निर्णय घेतील. आम्ही केवळ लोकसभा आणि विधानसभेसाठी रणनिती बनवली आहे. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या जागी अडीज वर्षांनंतर दुसरा मुख्यमंत्री असेल ही अफवा असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

काय म्हणाले होते नाना पटोले?

तिवसा येथे बोलताना नाना पटोले म्हणाले होते की, "तुम्हाला वाटत नाही का, की २०२४ मध्ये नाना पटोलेंना मुख्यमंत्री बनवावं?" तसेच शिवसेनेची पाठराखण करणाऱ्या शरद पवारांनाही यावेळी त्यांनी टोला लगावला. तसेच काँग्रेस हाच मूळ पक्ष आहे, असंही पटोले म्हणाले. "आम्हाला कोणाकडूनही याबाबत प्रमाणपत्र नकोय. जर आम्हाला कोणी बाजूला सारू पाहत असेल तर त्याचा अर्थ असा नाही की आम्ही बाजूला होऊ. पण २०२४ पर्यंत काँग्रेस पुन्हा महाराष्ट्रात सर्वात मोठा पक्ष असेल." असंही पटोले यावेळी म्हणाले.

loading image
go to top