Belgaum News : ऐन पावसाळ्यात दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर बेळगावात पाडला कृत्रिम पाऊस; शेतकऱ्यांना मोठा दिलासा

दोन दिवस बेळगाव जिल्ह्यात कृत्रिम पाऊस पाडण्याचे प्रयत्न सुरु आहेत.
Belgaum Satish Jarkiholi Sambra Airport
Belgaum Satish Jarkiholi Sambra Airportesakal
Summary

जिल्ह्यात तीन दिवस कृत्रिम पावसाचे नियोजन आहे. शुक्रवारी गोकाक व खानापुरात कृत्रिम पाऊस पाडला.

बेळगाव : दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शेतकरी बांधवांना अनुकूल व्हावे, या दृष्टीने जिल्ह्यात काल (ता. २९) आणि आज (ता. ३०) असे दोन दिवस कृत्रिम पाऊस (Artificial Rain) पाडण्याचा प्रयोग करण्यात येत आहे. हुदली येथील बेळगाम शुगर यांच्यावतीने कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी पुढाकार घेतला आहे.

शुक्रवारी (ता. २९) दुपारी त्याचा प्रारंभ जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी (Satish Jarkiholi) यांच्या हस्ते पार पडला. येथील सांबरा विमानतळावर (Sambra Belgaum Airport) आलेल्या विशेष विमानातून रासायनिक द्रवांची फवारणी ढगांवर करण्यात येत आहे. मोजक्या ढगांवर रासायन फवारुन कृत्रिम पाऊस पडण्याचा प्रयोग करण्यात येत आहे.

Belgaum Satish Jarkiholi Sambra Airport
Konkan Rain : कोकण किनारपट्टी भागात पुढील तीन-चार दिवस पावसाचा जोर वाढणार; हवामान विभागानं वर्तवला अंदाज

यासाठी नागरी विमानोड्डाण महासंचालय कार्यालयाने ग्रीन सिग्नल दिला आहे. शुक्रवारी आणि शनिवारी (ता. ३०) दोन दिवस बेळगाव जिल्ह्यात कृत्रिम पाऊस पाडण्याचे प्रयत्न आहेत. विमानाचे कॅप्टन वीरेंद्र सिंग आणि कॅप्टन आदर्श पांडे यांच्या नेतृत्वाखाली विमानाद्वारे रासायनिक द्रवांची फवारणी करण्यात येत आहे. कमी अंतरावर असणाऱ्या ढगांच्या आकर्षणासाठी सीएसीएल टू आयोडाइड आणि २० हजार फूट अंतरावर असणाऱ्या ढगांच्या आकर्षणासाठी सिल्वर आयोडाइड रासायन फवारणी करण्यात येत आहे.

एखाद्या वेळेस निर्दिष्ट प्रदेशाच्या कार्यक्षेत्रात ढग जमल्यास रासायनिक द्रवांची फवारणी झालेल्या काही मिनिटात पावसाला सुरुवात होणार आहे. तर ढग नसल्यास फवारणी न करताच विमान परतणार आहे, अशी माहिती विमानाच्या तांत्रिक कर्मचाऱ्यांनी यावेळी दिली. याप्रसंगी जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्यासह उत्तरचे आमदार असिफ सेठ, विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी, युवा नेते राहुल जारकीहोळी आदींसह अन्य उपस्थित होते.

Belgaum Satish Jarkiholi Sambra Airport
Rajaram Factory : 'गुंडांच्या जोरावर सभा गुंडाळलीये, कारखान्याचे धुराडे पेटू देणार नाही'; विरोधकांचा सत्ताधाऱ्यांना इशारा

वातावरण पोषक

शुक्रवारी बेळगाव परिसरात पावसासाठी आवश्यक ढग आढळून आल्याने कृत्रिम पावसासाठी हे वातावरण पोषक असल्याचा अभिप्राय कर्मचाऱ्यांनी व्यक्त केला. ५ ते १० हजार फूट अंतरावर असणाऱ्या ढगांवर सिल्वर आयोडाइडची फवारणी करण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले.

Belgaum Satish Jarkiholi Sambra Airport
Dhananjay Mahadik : बंगळूर-कोल्हापूर-मुंबई विमानसेवेबाबत महाडिकांनी दिली महत्त्वाची अपडेट; कधी सुरू होणार Service?

कृत्रिम पावसाचे उद्दिष्ट पूर्ण - पालकमंत्री

जिल्ह्यावर दुष्काळाची छाया असल्याने कृत्रिम पाऊस पाडण्याची शेतकऱ्यांची अनेक दिवसांपासूनची मागणी आज पूर्णत्वास आली असल्याची प्रतिक्रीया पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी दिली आहे. हुदली येथील बेळगाव शुगर्स प्रा.लि.च्या नेतृत्वाखाली शुक्रवारी (ता. २९) सांबरा विमानतळावर कृत्रिम पाऊस उपक्रमाचा प्रारंभ करून पत्रकारांसमोर ते बोलत होते. कृत्रिम पावसासाठी केंद्राकडून २० दिवसांनंतर मंजुरी मिळाली आहे.

जिल्ह्यात तीन दिवस कृत्रिम पावसाचे नियोजन आहे. शुक्रवारी गोकाक व खानापुरात कृत्रिम पाऊस पाडला. शनिवार आणि रविवारीही हा उपक्रम राबविण्यात येईल. प्रति दिनी तीन तास उपक्रम राबविण्यात येईल, विमानाने एकदा उड्डाण केली की, त्याचा संचार आकाशात तीन तास सुरू राहणार आहे, असे पालकमंत्र्यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com