PM मोदींचा ताफा अडवणाऱ्या शेतकऱ्यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...

PM Modi Security Breach : संयुक्त किसान मोर्चाने याबद्दल आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
PM Modi
PM ModiANI

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फिरोजपूर दौरा सुरक्षेतील मोठ्या त्रुटींमुळे रद्द करण्यात आला. या घटनेनंतर देशभरात राजकारण ढवळून निघालं. काँंग्रेस आणि पंजाब सरकारवर या प्रकरणात गंभीर आरोप करण्यात आले आहेत. त्यानंतर आता काही या प्रकरणात वेगवेगळ्या बाजू समोर येत आहेत. त्यातच आता भारतीय किसान युनियन (BKU) प्रमुख सुरजित सिंग फूल यांनीही आपली बाजू मांडली आहे. गुरुवारी त्यांनी सांगितलं की, फिरोजपूरच्या वरिष्ठ पोलीस अधीक्षकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) रस्त्याने जाणार असल्याचं सांगून रस्ता मोकळा करण्यास सांगितलं होतं. तेव्हा आंदोलकांना वाटलं की, ते अधिकारी फक्त त्यांना रस्त्यावरून हटविण्यासाठी हे सगळं करत आहेत. पंतप्रधान मोदी रस्त्याने जाणारच नाहीत, ते हवाई मार्गाने जातील असं आम्हाला वाटलं असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

PM Modi
बळकावलेल्या भूभागावर चीनकडून पूल उभारणी

पत्रकारांशी बोलताना फूल म्हणाले, "पंतप्रधान रस्त्याने सभेच्या ठिकाणी जात असल्याचं सांगत फिरोजपूरच्या एसएसपीने आम्हाला रस्ता मोकळा करण्यास सांगितलं. आम्हाला वाटलं की ते खोटं बोलत आहेत." पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फिरोजपूर दौरा सुरक्षेतील मोठ्या त्रुटींमुळे रद्द करण्यात आल्यानंतर गृह मंत्रालयाने एका निवेदनात म्हटलं आहे की, काही आंदोलकांनी रास्ता रोको केल्यामुळं पंतप्रधान 15-20 मिनिटे फ्लायओव्हरवर अडकले होते. या गंभीर सुरक्षेतील त्रुटींची दखल घेत गृह मंत्रालयाने राज्य सरकारकडून सविस्तर अहवाल मागवला आहे. एवढंच नाही तर भाजपने सत्ताधारी काँग्रेस सरकारवर पंतप्रधानांच्या कार्यक्रमात घोळ आणि सुरक्षेत मोठी कुचराई केल्याचा आरोप केला आहे.

PM Modi
मोठा निर्णय! विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीच्या खर्चाची मर्यादा वाढणार

पंजाबचे माजी मुख्यमंत्री आणि शिरोमणी अकाली दलाचे प्रमुख प्रकाशसिंग बादल म्हणाले की, मोदींच्या दौऱ्यात व्यत्यय यायला नको होता, रस्त्यावर अडथळे निर्माण करायला नको होते, मात्र दुसरीकडे हे सुद्धा सत्य आहे की, त्यांच्या सभेला गर्दी नव्हती. तसंच राज्यात जर राष्ट्रपती राजवट लागू करण्याबद्दल विचार होत असेल तर आम्ही त्याचा कडाडून विरोध करू.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com