बळकावलेल्या भूभागावर चीनकडून पूल उभारणी | India China | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

India and China
बळकावलेल्या भूभागावर चीनकडून पूल उभारणी

बळकावलेल्या भूभागावर चीनकडून पूल उभारणी

नवी दिल्ली : पॅंगाँग सरोवराच्या उत्तर आणि दक्षिण टोकांना जोडणारा पूल चीनकडून (China) उभारला जात असल्याने भारताकडून आज संताप व्यक्त करण्यात आला. ‘‘मागील साठ वर्षांपासून अवैधरीत्या चीनच्या ताब्यात असलेल्या भूभागात पुलाचे बांधकाम केले जात आहे यावर भारताचे लक्ष असून सुरक्षेसाठी योग्य ती पावले उचलली जातील,’’ असा इशारा परराष्ट्र मंत्रालयाने चीनला दिला आहे. (China Develops India's Land)

चीनसोबतचा सीमावाद टोकाच्या वळणावर पोहोचला असताना चीन पॅंगाँग सरोवरावर पूल बांधत असल्याचे उपग्रह छायाचित्रातून स्पष्ट झाल्यानंतर भारत संतापला आहे. नव्या वर्षाच्या पहिल्या दिवशी चीनने गलवान खोऱ्यात चिनी सैनिक झेंडा फडकावत असल्याचा व्हिडिओ जारी केला होता. अरुणाचल प्रदेशावर दावा सांगताना चीनने या राज्यातील काही जागांचे चिनी भाषेत केलेले नामकरण केल्यामुळे तणाव वाढला आहे.

हेही वाचा: नागपूर : लक्षणे नसलेले बाधित वाऱ्यावर; कुटुंबीयांची धाकधूक वाढली

परराष्ट्र मंत्रालयाच्या साप्ताहिक वार्तालापादरम्यान प्रवक्ते अरिंदम बागची यांनी या मुद्द्यावर भारताची भूमिका स्पष्ट करताना चीनला सज्जड इशारा दिला. गलवान खोऱ्याबाबतचा चिनी व्हिडिओ वस्तुस्थितीला धरून नाही, अशा शब्दांत त्यांनी खिल्ली उडविली. अरुणाचल प्रदेशातील स्थानांची नावे बदलण्याची चीनची कृती हास्यास्पद असल्याचा टोलाही लगावला. चीनने अरुणाचल प्रदेशातील काही भागांची नावे बदलण्याच्या बातम्या पाहण्यात आल्या.

याबाबत भारताची भूमिका स्पष्ट करण्यात आली आहे. आमच्या भूभागावर दावा करण्यासाठीच्या अशा प्रकारच्या गोष्टी निरर्थक आहेत असे ते म्हणाले. चीनने बाष्कळ गोष्टी करण्यायाऐवजी ताबारेषेच्या पश्चिम भागात जो तणाव वाढला आहे, त्यावर सकारात्मक तोडगा काढण्यासाठी कार्यवाही करावी, असा उपरोधिक सल्लाही अरिंदम बागची यांनी दिला.

हेही वाचा: नागपूरात विदेशी प्रवास न करता ६ जण ओमिक्रॉनबाधित

कधीही मान्यता देणार नाही

पॅंगाँग सरोवरावरील पुलासंदर्भात भारताची भूमिका स्पष्ट करताना बागची यांनी भारतीय भूभागावर ६० वर्षांपासून चीनचा बेकायदा कब्जा असल्याचे फटकारले. या भागात चीन पूल बांधत असून सरकार या अवैध कब्जाला कधीही मान्यता देणार नाही. मागील सात वर्षांत सरकारने सीमा भागामध्ये पायाभूत सुविधा वाढविल्या असून सुरक्षा हित जपण्यासाठी योग्य कार्यवाही केली जात असल्याचे बागची म्हणाले.

सोबतच, भारतीय खासदारांना चिनी वकिलातीच्या राजनैतिक अधिकाऱ्यांकडून आक्षेपाची पत्रे पाठविण्याचा प्रकार द्विपक्षीय संबंध बिघडविण्याचा प्रयत्न असल्याचे ते म्हणाले.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :ChinaIndia
loading image
go to top