
भाजप खासदारांच्या कार्यक्रमादरम्यान मंचावर स्फोट; हा अपघात की कट?
परशुराम जयंतीच्या समारोप सोहळ्याला पोहोचलेले माजी केंद्रीय मंत्री डॉ. महेश शर्मा यांच्यासह अनेक भाजप नेत्यांच्या सुरक्षेत मोठी कुचराई झाली. मंचावर अचानक बॉम्बसदृश वस्तूचा स्फोट (Explosion) झाला आणि तंबूला आग लागली. यामुळे चेंगराचेंगरी झाली, असे भाजप नेत्यांचे म्हणणे आहे. शर्मा यांनी यासंदर्भात नोएडाचे पोलिस आयुक्त आलोक सिंग यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे. ही घटना उत्तर प्रदेशातील गौतम बुद्धनगर जिल्ह्यातील जेवर येथील प्राचीन दौजी मंदिरात घडली. (Explosion on stage during BJP MPs program)
कसबा येथील परशुराम जन्मोत्सवाच्या समारोप समारंभात माजी केंद्रीय मंत्री आणि भाजप खासदार डॉ. महेश शर्मासह अनेकजण मंचावर होते. यावेळी आयोजकांनी आतषबाजी केली. पोलिसांनी नकार दिल्यानंतरही फटाके फोडणे सुरूच ठेवले होते. प्रथमदर्शनी असे दिसते की एक सुतळी बॉम्ब स्टेजच्या बाजूला (Explosion) पडला. त्यामुळे मोठा स्फोट झाला आणि तंबूला आग लागली, असे अतिरिक्त पोलिस उपायुक्त (झोन ३) विशाल पांडे यांनी प्रसिद्ध केलेल्या व्हिडिओमध्ये सांगितले.
हेही वाचा: नवविवाहित सुनेने खासदारांना आशीर्वादात मागितला चक्क रस्ता
हे प्रकरण गांभीर्याने घेत पोलिसांनी तपास सुरू केल्याचे अतिरिक्त पोलिस उपायुक्तांनी सांगितले. स्निफर डॉग स्क्वॉड, बॉम्ब (Bom) निकामी पथक आणि फॉरेन्सिक सायन्स टीमला घटनास्थळी पाचारण करण्यात आले. आतापर्यंतच्या तपासात अशी कोणतीही गोष्ट समोर आलेली नाही. रात्री दहा वाजताच्या सुमारास बॉम्बसदृश वस्तू स्टेजवर पडून स्फोट झाला. तेथे गोंधळ सुरू असताना सुरक्षा कर्मचाऱ्यांनी डॉ. महेश शर्मा यांच्यासह लोकप्रतिनिधींना वाहनांमध्ये बसवले. मंदिर व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शिवकुमार शर्मा आणि सरचिटणीस हेमंत मिश्रा यांच्यावतीने पोलिसांकडे लेखी तक्रार देऊन घटनेची चौकशी करून कारवाईची मागणी करण्यात आली आहे.
तंबूवर बॉम्बसारखे काहीतरी पडले
मंचावर असताना तंबूवर बॉम्बसारखे काहीतरी पडले आणि स्फोट (Explosion) झाला. यामुळे मंडपातही आग लागली. ती वस्तू मंचावर बसलेल्या नेत्यांच्या डोक्यावर पडली असती तर जीव गमवावा लागला असता. ही एक मोठी सुरक्षा त्रुटी आहे. पोलिस आयुक्तांकडे तक्रार करून चौकशी करण्याची मागणी केली आहे, असे डॉ. महेश शर्मा म्हणाले.
हेही वाचा: गहू ठरवणार PM मोदींची जगातील विश्वासार्हता; वाचा ते कसे?
हा अपघात आहे की कट?
हा अपघात आहे की कट? हे तपासानंतरच कळेल. मात्र, बॉम्बसारख्या वस्तूने सुरक्षा वर्तुळ नक्कीच मोडीत काढले आहे. मंचाच्या बाजूला काही प्राणघातक वस्तू फेकण्यात आली होती आणि पोलिसांना ती सापडली नाही, असे चंद शर्मा म्हणाले.
Web Title: Explosion On Stage During Bjp Mps Program
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..