नवविवाहित सुनेने खासदारांना आशीर्वादात मागितला चक्क रस्ता | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Newlyweds asked the MPs for new road

नवविवाहित सुनेने खासदारांना आशीर्वादात मागितला चक्क रस्ता

कार्यकर्त्याच्या नवविवाहित वधूला आशीर्वाद देण्यासाठी भाजपचे खासदार सतीश गौतम गावात पोहोचले. यावेळी एमए पास सुनेने खासदारांना रस्ता बांधण्याची (new road) मागणी केली. सुनेचे म्हणणे ऐकून खासदार पहिल्यांदा हसले. त्यानंतर सुनेला आश्वासन देत महिनाभरात रस्त्याचे काम सुरू होईल, असे सांगितले. यानंतर खासदारांनी रस्त्याचा आढावा घेतला. हा प्रकार उत्तर प्रदेशातील अलिगडमध्ये घडला. (Newlyweds asked the MPs for new road)

प्राप्त माहितीनुसार, अलिगडमधील काशिशो गावात राहणारे नवीन कुमार शर्मा यांचे खासदार सतीश गौतम यांच्याशी घनिष्ठ सामाजिक आणि राजकीय संबंध आहे. शर्मा यांचा एकुलता एक मुलगा दीपांशू शर्मा याचे लग्न प्रियांकासोबत (रा. मुरसान, हाथरस) झाले. मात्र, व्यस्ततेमुळे खासदार लग्न समारंभाला पोहोचू शकले नाहीत. रविवारी नवदाम्पत्याला आशीर्वाद देण्यासाठी खासदार गावात पोहोचले होते. खासदारांनी खिशातून लिफाफा काढून सुनेला देताच सुनेने रस्ता बांधण्यास सांगितले.

हेही वाचा: 'शोरमा खाणे टाळा; ते भारतीय पाककृतीचा भाग नाही'

मंदिराचा रस्ता खूपच खराब आहे. त्यामुळे मी रस्ता बांधकामाची (new road) मागणी केली. खासदारांनीही रस्ता बांधून देण्याचे आश्वासन दिले. सुनेने आशीर्वाद घेण्यासाठी खासदारांच्या पायाला हात लावल्यावर खासदाराने भेटवस्तू म्हणून सुनेला लिफाफा दिला. यावेळी सुनेने ‘मी ज्या रस्त्याने आली त्या रस्त्याची अवस्था अत्यंत वाईट आहे. तो दुरुस्त करून द्या’ अशी मागणी खासदारांपुढे केली. यावर खासदार सतीश गौतम यांनी सुनेला महिनाभरात रस्ता तयार करून देण्याचे आश्वासन दिले. सुनेच्या या मागणीने गावातील नागरिक आनंदी झाले.

सुनेने मी दिलेला लिफाफा स्वीकारला. मात्र, लिफाफ्यापेक्षा मला रस्ता हवा (new road) आहे, अशी मागणी तिने केली. मी ज्या मंदिरात पाणी अर्पण करायला जाते, तो रस्ता खूपच खराब आहे. हा रस्ता तयार करून दिला तर बरं होईल. सुनेच्या मागणीला प्रतिसाद देत महिनाभरात रस्ता पूर्ण करण्याचे आश्वासन दिल्याचे खासदार सतीश गौतम म्हणाले. नवविवाहित प्रियांका एमएपर्यंत शिकलेली आहे.

Web Title: Newlyweds Asked The Mps For New Road Uttar Pradesh

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top