Brahmos Air Launched Missile : चीन-पाकिस्तानच्या उरात धडकी! 'ब्रह्मोस'च्या एक्स्टेंडेड रेंजची यशस्वी चाचणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Brahmos Air Launched Missile

Brahmos Air Launched Missile : चीन-पाकिस्तानच्या उरात धडकी! 'ब्रह्मोस'च्या एक्स्टेंडेड रेंजची यशस्वी चाचणी

नवी दिल्लीः सध्या भारताने आपली ताकद वाढविण्यावर भर दिलाय. आज चीन आणि पाकिस्तानच्या उरात धडकी भरेल अशी चाचणी भारतात झाली आहे. ब्रह्मोसच्या विस्तारित रेंजची यशस्वी चाचणी आज झाली. सुखोई विमानाने अचून लक्ष्य भेदून शत्रूला आपली ताकद दाखवून दिली आहे.

ब्रह्मोसच्या क्षेपणास्त्रातून सुखोई विमानाद्वारे बंगालच्या खाडीमध्ये ही चाचणी घेण्यात आली आहे. सुखोई-३० एमकेआय (Su-30MKI) विमानाच्या यशस्वी कामगिरीने भारतीय वायू सेनेचं बळ वाढलं आहे.

हेही वाचाः क्रेडिट कार्ड वापरताय...मग या गोष्टी माहिती हव्याच....

यापूर्वी २९ नोव्हेंबर रोजी जमिनीवरुन जमिनीवर मारा करणाऱ्या ब्रह्मोस सुपरसॉनिक क्रूझ मिसाईलचं टेस्टिंग झालं होतं. ही चाचणी अंदमान-निकोबार द्वीप समूह कमानच्या वतीने करण्यात आली होती.

क्षणात शत्रूचा घात करण्याची ताकद

पाणी, जमीन आणि आकाश या तिन्ही आघाड्यांवर ब्रह्मोसच्या माध्यमातून भारताचं सुरक्षा कडं मजबुत झालं आहे. काही क्षणात शत्रूच्या ठिकाणांना उद्ध्वस्त करण्याची ब्रह्मोसमध्ये क्षमता आहे. या क्षेपणास्राचं हवाई व्हर्जन २०१२ मध्ये आलं होतं. २०१९मध्ये या मिसाईलचा भारतीय वायुसेनमध्ये समावेश करण्यात आला. या मिसाईलची रेंज वाढवण्याचा भर दिला जात आहे.

हेही वाचा: Year Ender 2022 : श्रद्धाचे 35 तुकडे ते भट्टीत बापाला जाळले... 'या' 7 घटनांनी देश हादरला

भारताचा प्रलय!

चीन आणि पाकिस्तानने आता कुरापती थांबवून भारतापासून सावध राहिलं पाहिजे. कारण भारत सरकारने २५ डिसेंबर रोजी १२० प्रलय बॅलिस्टिक मिसाईच्या खरेदीला परवानगी दिलीय. हे क्षेपणास्त्र १५० ते ५०० किलोमीटरपर्यंतचे लक्ष्य भेदू शकतं. विशेष म्हणजे या क्षेपणास्त्रांची रेंज आवश्यकतेनुसार वाढवता येणार आहे. २०१५मध्ये प्रलय क्षेपणास्त्र विकसित करण्यासाठी काम सुरु झाले होते. दिवंगत जनरल बिपिन रावत यांनी या प्रोजेक्टवर भर दिला होता.