पॅन आणि आधारच्या जोडणीसाठी 30 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ

aadhar card
aadhar card

नवी दिल्ली - पॅन (परमनंट अकाऊंट नंबर) आणि आधारकार्डची जोडणी करणे बंधनकरक असल्याने त्यासाठीची मुदत वाढविण्यात आली आहे. पॅन-आधार जोडणीची मुदत 31 रोजी संपणार होती. मात्र आता ही तारिख पुढे ढकलण्यात आली असून, 30 सप्टेंबर 2019 पर्यंत पॅन आणि आधार जोडणी करता येणार आहे. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (सीबीडीटी) घेतलेल्या निर्णयानुसार ही मुदत सहा महिन्यांनी वाढविण्यात आली आहे. एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे रविवारी ही माहिती देण्यात आली. 

पॅन-आधार जोडणीस आतापर्यंत सहावेळा मुदतवाढ देण्यात आली आहे. यापूर्वी 30 जून 2018 रोजी ही मुदत संपली होती. मात्र त्यानंतर ही मुदत 31 मार्च 2019 करण्यात आली होती. 

दरम्यान, आधार क्रमांकाशी जोडणी न केलेले पॅन अवैध ठरू शकतील, अशी चुकीची माहिती पसरल्याने या प्रक्रियेस मुदतवाढ देण्यात आल्याचे सीबीडीटीने सांगितले. ही मुदत वाढवली असली तरी प्राप्तिकर विवरणपत्र सादर करताना आधार क्रमांक देणे एक एप्रिलपासून अनिवार्यच असेल, असेही सीबीडीटीने स्पष्ट केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com