'टायगर शार्क' दक्षिण किनारपट्टीला देणार 'सुखोई' संरक्षण!

वृत्तसंस्था
सोमवार, 20 जानेवारी 2020

हवेतल्या हवेत इंधन भरण्याचीही या विमानांची क्षमता असल्याने दूरवरील मोहिमांसाठीही ती उपयुक्त ठरू शकतात.

तंजावर : भारतीय हवाई दलाने दक्षिण भारतात प्रथमच सुखोई विमाने तैनात केली आहेत. तंजावर येथील हवाई दलाच्या तळावर सुखोई-30 एमकेआय या लढाऊ विमानांची एक तुकडी दाखल झाली आहे.

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

व्यूहात्मकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या हिंदी महासागर परिसरावर आता भारताची सुखोईद्वारे नजर राहणार आहे.

- Nirbhaya Case : दोषी पवनकुमारची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली; आदेश पुन्हा जारी!

सरसेनाध्यक्ष बिपीन रावत आणि हवाई दलप्रमुख एअर चीफ मार्शल राकेश कुमार भदुरिया यांच्या उपस्थितीत सुखोई 30 एमकेआय विमानांची 'टायगर शार्क'ही तुकडी दाखल करण्यात आली. या विमानांवर ब्राह्मोस क्षेपणास्त्रेही जोडण्यात आली आहेत.

- Delhi Election:अरविंद केजरीवाल उमेदवारी अर्जच भरू शकले नाही!

सुखोई 30 एमकेआय हे भारताचे अत्याधुनिक, सर्व प्रकारच्या परिस्थितीमध्ये उड्डाण करण्यास सक्षम असलेले लढाऊ विमान असून हे विमान जमीन, हवाई आणि सागरी मोहिमांमध्ये मोलाची कामगिरी बजावू शकते. या विमानांमुळे दक्षिणेकडील भारताचा सागरी किनारा आणि बेटे अधिक सुरक्षित झाली आहेत, असे संरक्षण दलाने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे. 

- Happy Birthday : अजित दोवालांविषयी या गोष्टी माहितीच हव्यात!

हवाई दलाच्या 2018 मध्ये झालेल्या गगनशक्ती या हवाई सरावावेळी सुखोई विमानांनी आपली क्षमता सिद्ध केली होती. हवेतल्या हवेत इंधन भरण्याचीही या विमानांची क्षमता असल्याने दूरवरील मोहिमांसाठीही ती उपयुक्त ठरू शकतात.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Eye on China and South Indian ocean gets first Sukhoi squad with BrahMos