जगभरातील फेसबुक, इन्स्टाग्राम 'क्रॅश'

वृत्तसंस्था
मंगळवार, 20 नोव्हेंबर 2018

नवी दिल्ली : फेसबुकचे मेसेंजर डाऊन झाल्यानंतर आता फेसबुक आणि इन्स्टाग्राम 'क्रॅश' झाले आहे. त्यामुळे भारतातील फेसबुक आणि इन्स्टाग्राम युजर्सनाही गेल्या काही तासांपासून या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. शेकडो युजर्सनी याबाबतची तक्रार फेसबुककडे केली आहे.

फेसबुक आणि इन्स्टाग्राम क्रॅश झाल्याने प्रामुख्याने अमेरिका, इंग्लंड, युरोपसह ऑस्ट्रेलियातील युजर्सना याचा फटका बसला आहे. तसेच भारतातील काही युजर्सना फेसबुक आणि इन्स्टाग्राम अॅक्सेस करताना काही तांत्रिक अडचणी येत आहेत. या काही तांत्रिक कारणास्तव फेसबुक मेसेंजर कालपासूनच (सोमवार) डाऊन झाले होते. त्यानंतर आता फेसबुक आणि इन्स्टाग्राम 'क्रॅश' झाले आहे. 'service unavailable' हा मेसेज सध्या अनेक युजर्सना येत आहे. फेसबुक आणि इन्स्टाग्रामच्या निम्म्याहून अधिक युजर्सना या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. 

दरम्यान, फेसबुक आणि इन्स्टाग्रामसारखे सोशल मीडिया वापरणाऱ्या युजर्सना या तांत्रिक अडचणी येत असल्याने अनेक युजर्सकडून निराशा व्यक्त केली जात आहे. 

Web Title: Facebook and Instagram have CRASHED around the world less than a day after Messenger went down