फेसबुकवरील मैत्रिण निघाली तीन मुलांची आई...

वृत्तसंस्था
Tuesday, 13 October 2020

सोशल नेटवर्किंगसाठी प्रसिद्ध असलेल्या फेसबुकवरून दोघांची मैत्री झाली. मैत्रिचे रुपांतर प्रेमात झाले. दोघांनी विवाह करण्याचा निर्णय घेतला. पण, समोर आल्यानंतर मैत्रीण तीन मुलांची आई असल्याचे समजले. बैतुलमधील अजब प्रेमाची गजब कहानी चर्चेत आली आहे.

भोपाळ (मध्य प्रदेश): सोशल नेटवर्किंगसाठी प्रसिद्ध असलेल्या फेसबुकवरून दोघांची मैत्री झाली. मैत्रिचे रुपांतर प्रेमात झाले. दोघांनी विवाह करण्याचा निर्णय घेतला. पण, समोर आल्यानंतर मैत्रीण तीन मुलांची आई असल्याचे समजले. बैतुलमधील अजब प्रेमाची गजब कहानी चर्चेत आली आहे.

Video: लॉकडाऊनचा परिणाम; रोटीची अवस्था पाहा...

बैतूलच्या हिवरखेडी येथे राहणाऱया 21 वर्षाच्या युवकाचे फेसबुकवरून एका युवतीसोबत मैत्री झाली होती. मैत्री झाल्यानंतर दोघांनी एकमेकांचे नंबर शेअर केल्यानंतर फोनवरून बोलू लागले. पुढे मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. दोघांनी विवाह करण्याचा निर्णय घेतला. युवती उत्तरप्रदेशच्या महू येथून 750 किमी प्रवास करून युवकाच्या घरापर्यंत पोहचली. पण, मैत्रिणीकडे पाहिल्यानंतर त्याला शंका आली. तपासादरम्यान मैत्रिणीचा विवाह झाला असून, तिला तीन मुले असल्याचे समजले.

आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या युवतीचा प्रियकरासोबत विवाह!

पोलिस अधिकारी संतोष पटेल यांनी सांगितले की, 'युवतीणीने आपल्या पतीकडून होणार्‍या मारहाणीमुळे दुसरा विवाह करण्याचे ठरविले होते. तिने आपल्या मुलांना आई-वडीलांकडे सोडले होते. युवकासोबत दुसरा विवाह करण्यासाठी ती निघाली होती. युवतीच्या आई-वडिलांना बोलावले असून, तिला त्यांच्या ताब्यात देण्यात येणार आहे.'


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: facebook friend mother of 3 children want marry to friend at madhya pradesh