esakal | हुश्श! Facebook, WhatsApp, Instagram तब्बल सहा तासानंतर झालं सुरु
sakal

बोलून बातमी शोधा

हुश्श! Facebook, WhatsApp, Instagram तब्बल सहा तासानंतर झालं सुरु

हुश्श! Facebook, WhatsApp, Instagram तब्बल सहा तासानंतर झालं सुरु

sakal_logo
By
विनायक होगाडे

अगदी काहीवेळापूर्वी मोबाईलचं इंटरनेट बंद पडलंय की काय? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. कारण काही वेळापुर्वी तुम्हाला फेसबुक आणि व्हाट्सअ‍ॅपचे अपडेट्स येणं बंद झालं असेल. तुम्ही अनेक प्रयत्न केले असतील मात्र, ते करुनही तुम्ही अयशस्वी ठरला असाल. याचं कारण ही अडचण काही तुमच्या एकट्याला येत नसून संपूर्ण जगातील फेसबुकसंबधित अ‍ॅप्स बंद पडले होते. यामध्ये प्रामुख्याने फेसबुक, व्हाट्सअ‍ॅप आणि इंस्टाग्राम या अ‍ॅप्सचा समावेश होता. आज सायंकाळी 9:15 वाजेच्या सुमारास फेसबूक आणि व्हाट्सअप अ‍ॅपप्लिकेशन बंद पडले होते. मात्र आता तब्बल सहा तासानंतर हे अ‍ॅप्स पुन्हा एकदा सुरु झाले आहेत.

हेही वाचा: कंपनीचे अॅप्स पडले बंद; फेसबुकनं माफी मागत दिलं 'हे' स्पष्टीकरण

सुरूवातीला काही काळ पावसामुळे इंटरनेट गेल्याची शंका निर्माण झाली होती, मात्र त्यानंतर फेसबुक आणि व्हाट्सअ‍ॅप वगळता सर्व वेबासाईट्स सुरू असल्याचं दिसून आलं. यानंतर ट्विटर फेसबुक डाऊन, व्हाट्सअ‍ॅप डाऊन असे ट्रेंड देखील सुरु झाले. यापुर्वी देखील अनेक वेळा काही तांत्रिक अडचणींमुळे फेसबूक आणि व्हाट्सअप बंद झाल्याचे आढळले होते.

हेही वाचा: फेसबुक व्हाट्सअप झालं डाऊन; नेटकरी हैराण

काय म्हणाले फेसबुक-व्हाट्सअप?

याबाबत आता फेसबुकने स्पष्टीकरण दिलं आहे. त्यांनी म्हटलंय की, आम्हाला माहिती आहे की काही लोकांना आमच्या अ‍ॅप्स आणि उत्पादने वापरण्यामध्ये अडचणी येत आहे. आम्ही शक्य तितक्या लवकर गोष्टी पूर्ववत करण्यासाठी काम करत आहोत आणि होत असलेल्या गैरसोयीबद्दल आम्ही दिलगीर आहोत.

व्हाट्सऍपने म्हटलंय की, काहींना सध्या व्हाट्सअ‍ॅप वापरण्यामध्ये अडचण येत असल्याचं आम्ही जाणून आहोत. परिस्थिती लवकरात लवकर पूर्ववत होण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. याबाबत आम्ही लवकरच माहिती देऊ.

सोशल मीडिया ही गोष्ट आता प्रत्येकासाठीच अत्यावश्यक झाली असून, हे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म बंद असल्याने अनेकजण हैराण झाले होते. त्यानंतर आता ट्विटर व्हाट्सअप आणि फेसबूक डाऊनचा हॅशटॅग ट्रेंड झाले होते. त्यानंतर अनेकांनी आपलं फेसबुक, व्हाट्सअ‍ॅप बंद झाल्याने वेगवेळे प्रयोग करून सुरू करण्याचा प्रयत्न केले. मात्र नंतर कंपनीकडूनच अडचण असल्याचे समोर आलं आहे.

loading image
go to top