महागठबंधनाला अपयश : राजनाथसिंह

वृत्तसंस्था
मंगळवार, 11 डिसेंबर 2018

नवी दिल्ली : नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकांचे निकाल येणे अद्याप बाकी आहे. आमदारकीचे सर्व उमेदवार आणि जिंकलेल्या राजकीय पक्षांचे मी अभिनंदन करतो. मात्र, तेलंगणात महागठबंधनाला सपशेल अपयश आले आहे, असे भाजप नेते आणि केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी सांगितले.

मध्यप्रदेश, राजस्थान, तेलंगणा, मिझोराम आणि छत्तीसगड विधानसभा निवडणुकांचे निकाल समोर येत आहेत. या निवडणुकीत काँग्रेसची विजयाच्या दिशेने वाटचाल होताना दिसत आहे. तर भाजप पिछाडीवर असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यावर आता राजनाथसिंह यांनी या निकालावर भाष्य केले. ते म्हणाले, आताच्या या निकालात काहीही स्पष्ट झालेले नाही. विजयी उमेदवार आणि राजकीय पक्षांचे अभिनंदन करतो. मात्र, महागठबंधनला या कठीणपणे अपयश आले आहे. 

Web Title: Failure of the alliance of Mahagathabandhan says Union Home Minister Rajnath Singh