Giant Wheel Collapse : जत्रेतील 'झुला' कोसळल्याने भीषण दुर्घटना!, अनेकजण गंभीर जखमी, एकाचा मृत्यू

India Fair Tragedy : जाणून घ्या, नेमकी कुठं घडली आहे ही मोठी दुर्घटना? ; दुर्घटना घडली तेव्हा त्या झुल्यात अनेकजण बसलेले होते.
India Fair Tragedy

India Fair Tragedy

esakal

Updated on

Giant Wheel Collapse Causes Panic at Fair : हरियाणातील फरिदाबाद येथील ‘सूरजकुंड मेळ्यात’ शनिवारी एक मोठी  दुर्घटना घडली. या ठिकाणी जत्रेत एक झुला कोसळला आणि त्यात अनेक लोक जखमी झाले तर एकाचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे.

दुर्घटना घडली तेव्हा त्या झुल्यात अनेकजण बसलेले होते. त्याच्या आसपासही गर्दी होती, त्यामुळे या दुर्घटनेतील जखमींची संख्या वाढला आहे. सूरजकुंड मेळ्यातील ही दुसरी मोठी दुर्घटना आहे. यापूर्वी, एक गेट कोसळल्याने दोन जण जखमी झाले होते.

सर्व जखमींना फरिदाबादमधील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघातात एका निरीक्षकाचा मृत्यू झाला आहे. प्रत्यक्षदर्शीने दिलेल्या माहितीनुसार,

India Fair Tragedy
Asaduddin Owaisi Statement : ''भारतात मुस्लिम लोकसंख्या कधीही हिंदूंपेक्षा जास्त होणार नाही'' ; ओवेसींचं मोठं विधान!

एका प्रत्यक्षदर्शीने पीटीआय वृत्तसंस्थेला सांगितले की, झुला वरच्या बाजूला अडकला होता आणि लोक ओरडू लागले. यानंतर झुला खाली येताना थेट खालीच कोसळला. या घटनांमुळे मेळ्यातील सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com