
एका तरुणाने तब्बल दहा वर्षे पोलीस असल्याचं सांगत अनेकांची फसवणूक केलीय. विशेष म्हणजे दहा वर्षात एकदाही तो बनावट पोलीस आहे आणि फसवणूक करतोय अशी तक्रारही दाखल झाली नाही. २०१५ पासून त्याने पोलीस कॉन्स्टेबल ते पोलीस निरीक्षक अशी बढती मिळाल्याचंही लोकांना सांगितलं. पोलीस असल्याचं भासवून लोकांना धमकावणं, फसवणूक करून त्यानं मोठ्या प्रमाणावर पैसेही उकळले. आजाद सिंह जादौन असं त्याचं नाव असून उत्तर प्रदेशात हा प्रकार उघडकीस आलाय.