मोदी-कलाम यांच्यासोबतचे फोटो, लग्झरी गाड्या; अख्खं दूतावास बनावट, जगाच्या नकाशावर नसलेल्या देशांच्या 'राजदूता'ला अटक

Harshwardhan Jain : उत्तर प्रदेश स्पेशल टास्क फोर्सच्या नोएडातील टीमने हर्षवर्धनला अटक केलीय. तो स्वत:ला अशा देशाचा राजदूत असल्याचं सांगायचा जे देशच जगाच्या नकाशावर नाहीत.
Harshwardhan Jain Busted as Fake Diplomat
Harshwardhan Jain Busted as Fake DiplomatEsakal
Updated on

उत्तर प्रदेशातील गाझियाबादमधून हर्षवर्धन जैन नावाच्या व्यक्तीला अटक करण्यात आलीय. त्यानं सुरक्षा यंत्रणेसह गुप्तचर एजन्सींनाही आश्चर्याचा धक्का दिलाय. उत्तर प्रदेश स्पेशल टास्क फोर्सच्या नोएडातील टीमने हर्षवर्धनला अटक केलीय. तो गाझियाबादच्या कविनगर परिसरात बनावट दूतावास चालवत होता. स्वत:ला अशा देशाचा राजदूत असल्याचं सांगायचा जे देशच जगाच्या नकाशावर नाहीत. फक्त बनावट ओळखीच्या आधारेच हे नेटवर्क सुरू होतं असं नाही. तर परकीय चलनाचे बेकायदेशीर व्यवहारही होत होते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com