

Investigation Into Fraud Network and Earlier Cases
esakal
सरकारी अधिकारी असल्याचे सांगून लोकांवर प्रभाव पाडणे आणि त्याचाच फायदा घेत कोट्यवधी रुपये उकळण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तब्बल १४ वर्षे स्वतःला आयएएस (IAS) अधिकारी असल्याचे भासवून लोकांची फसवणूक करणाऱ्या रामानुज गुर्जर याला अखेर पोलिसांनी अटक केली आहे. विशेष म्हणजे, या आरोपीचे शिक्षण केवळ बारावीपर्यंत झाले आहे. मात्र, आयएएस अधिकारी असल्याचा बनाव करून त्याने अनेकांना गंडा घातला. गुजरातच्या गांधीनगर पोलिसांनी त्याला अटक करून कारागृहात पाठवले आहे.
सकाळ, साम, सरकारनामा, अॅग्रोवन आणि दैनिक गोमन्तक — आता एकाच ॲपमध्ये! आजच सकाळ ॲप डाउनलोड करा