दोन हजारांची बनावट नोट बाजारात

यूएनआय
रविवार, 13 नोव्हेंबर 2016

सरकारच्या चिंतेत भर
नुकतेच व्यवहारात आलेल्या व बहुतेकांना अजून ज्या नोटा पाहायलाही मिळाल्या नाहीत, त्या दोन हजारांच्या बनावट नोटा आढळून आल्या आहेत. दोनच दिवसांपूर्वी रिझर्व्ह बॅंकेने दोन हजारांची नोट लागू केली होती; पण त्यानंतर लगेचच दोन हजारांच्या बनावट नोटा आढळून आल्याने सरकारच्या चिंतेत भर पडली आहे.

चिकमंगळूर - ग्राहकांनो सावधान! दोन हजारांची नोट घेताय, मग त्यातील सुरक्षेसाठी असलेली सर्व फीचर्स तपासून पाहा, कारण बाजारात दोन हजारांची बनावट नोट आली आहे. रिझर्व्ह बॅंकेने मूळ नोट लागू करून दोन दिवसही उलटले नसताना दोन हजारांची बनावट नोट आल्याने आता नागरिकांच्या समस्यांमध्ये वाढ होणार आहे.

चिकमंगळूर येथील ऍग्रिकल्चर प्रोड्यूस मार्केटिंग कमिटी (एपीएमसी) येथे बनावट नोटा आढळून आल्या. एक ग्राहक शेतमाल खरेदी करण्यासाठी दोन हजारांची बनावट नोट घेऊन दुकानात आल्याचे दुकानदाराने सांगितले. ही नोट कलर कॉपिइंग मशिनच्या साहाय्याने बनविण्यात आली होती. "एपीएमसी'मधील कामगाराने बनावट नोटही घेतली, पण नोट बनावट असल्याची त्याला कल्पनाही आली नाही. इतकेच नव्हे, तर त्याला ती नोट कुणी दिली हे देखील आठवत नसल्याचे पोलिसांनी सांगितले.

ही नोट कलर प्रिंटरवर फोटो कॉपी केल्याचे सांगण्यात आले. बनावट नोटेचे मूळ नोटेशी साम्य असले तरी सुरक्षेच्या दृष्टीने असलेले प्रमुख घटक या नोटेमध्ये नव्हते. याबाबत पोलिस तपास करत असून, बनावट नोटेचा नंबर असलेली मूळ नोट कोणत्या बॅंकेतून व्यवहारात आली, याचा शोध घेण्यात येत आहे.

सरकारच्या चिंतेत भर
नुकतेच व्यवहारात आलेल्या व बहुतेकांना अजून ज्या नोटा पाहायलाही मिळाल्या नाहीत, त्या दोन हजारांच्या बनावट नोटा आढळून आल्या आहेत. दोनच दिवसांपूर्वी रिझर्व्ह बॅंकेने दोन हजारांची नोट लागू केली होती; पण त्यानंतर लगेचच दोन हजारांच्या बनावट नोटा आढळून आल्याने सरकारच्या चिंतेत भर पडली आहे.

Web Title: fake note in market