एटीएममधून आल्या दोन हजारच्या बनावट नोटा

वृत्तसंस्था
बुधवार, 22 फेब्रुवारी 2017

नवी दिल्ली- संगंम विहार येथे असलेल्या एसबीआय बँकेच्या एटीएममधून दोन हजार रुपयांच्या बनावट नोटा मिळाल्याची तक्रार युवकाने पोलिसांकडे केली आहे.

रोहितकुमार या युवकाने तक्रारीत म्हटले आहे की, एसबीआयच्या एटीएममधून आठ हजार रुपये काढले असता दोन हजार रुपयांच्या चार बनावट नोटा बाहेर आल्या. या नोटांवर 'चिल्ड्रन्स गव्हर्नमेंट' असे लिहीलेले आहे.

वरिष्ठ पोलिस अधिकाऱयांनी सांगितले की, रोहितकुमारने दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करून घेण्यात आला आहे. बँकेच्या अधिकाऱयांशी संपर्क साधण्यात आला असून, याबाबत पुढील तपास सुरू आहे.

Web Title: Fake Rs 2000 notes from 'Children Bank of India' at Delhi SBI ATM