बेळगाव शैक्षणिक जिल्ह्याची दहावी निकालात घसरण

बेळगाव शैक्षणिक जिल्ह्याची दहावी निकालात घसरण

बेळगाव - शिक्षण खात्याने मंगळवारी दहावी परीक्षेचा निकाल जाहीर केला. राज्याचा एकूण निकाल 73.7 टक्के लागला आहे. यावेळी निकालात बेळगाव व चिक्कोडी शैक्षणिक जिल्ह्याची घसरण झाली आहे. 

गेल्यावेळी बेळगाव जिल्हा राज्यात 6 व्या क्रमांकावर होता मात्र यावेळी निकालात मोठी घसरण झाली असून बेळगाव 24 व्या क्रमांकावर तर गेल्या वेळी राज्यात 3 क्रमांकावर असणारा चिक्कोडी शैक्षणिक जिल्हा 13 व्या क्रमांकावर घसरला आहे.

हेरवाडकर शाळेचे यश

टिळकवाडी येथील हेरवाडकर इंग्रजी माध्यम शाळेच्या केयुरी शानबाग व केतकी ताम्हणकर यांनी 99.04 टक्के गुण घेत जिल्ह्यात अव्वल येण्याचा मान मिळविला आहे.

निकालात मुलींची बाजी

यावर्षीही निकालात मुलींनीच बाजी मारली आहे. 79.59 टक्के विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या असून विद्यार्थ्यांच्या उत्तीर्ण होण्याची टक्केवारी अधिक आहे. तर दहावी परीक्षेत हासन जिल्हा अव्वल ठरला आहे. सर्वात कमी निकाल यादगिरी शैक्षणिक जिल्ह्याचा लागला आहे.

दहावीची परीक्षा 22 मार्च ते 4  एप्रिलदरम्यान राज्यातील विविध परीक्षा केंद्रांवर पार पडली. राज्यातून यंदा 8 लाख 25 हजार 468 विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली होती. यापैकी 6 लाख 8 हजार 336 विद्यार्थी पास झाले आहेत.

बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यातील 29 हजारांहून अधिक विद्यार्थानी 104 परीक्षा केंद्रांवर परीक्षा दिली होती. यापैकी 77.43 टक्के विध्यार्थी पास झाले आहेत. शिक्षण खात्याने निकाल जाहीर केल्यानंतर शिक्षण खात्याच्या वेबसाईटवर निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांनी मोठी गर्दी केली होती. अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी जून महिन्यात परीक्षा घेण्यात येणार आहे. अशी माहिती शिक्षण खात्याने दिली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com