esakal | Video: अ‍ॅम्बुलन्स मिळेना! लेकावर आली आईचा मृतदेह बाईकवरुन नेण्याची वेळ
sakal

बोलून बातमी शोधा

andhra pradesh

Video: अ‍ॅम्बुलन्स मिळेना! लेकावर आली आईचा मृतदेह बाईकवरुन नेण्याची वेळ

sakal_logo
By
टीम-ई-सकाळ

हैदराबाद- देशात कोरोना महामारीने थैमान घातले आहे. दररोज 3 लाखांच्या पुढे कोरोना रुग्णसंख्या आढळून येत आहे. शिवाय हजारो लोकांचा मृत्यू होत आहे. लोकांनी हॉस्पिटल समोर रांगा लावल्या आहे. बेड्स, ऑक्सिजन अभावी लोकांना हॉस्पिटलच्या बाहेरच आपला जीव सोडावा लागत आहे. कोरोना काळात अनेक सुन्न करणाऱ्या घटना पाहायला मिळताहेत. अशीच एक घटना आंध्र प्रदेशच्या श्रीकाकुलम जिल्ह्यात पाहायला मिळाली. अ‍ॅम्बुलन्स न मिळाल्याने महिलेच्या मृतदेहाला टू-व्हीलरवरुन अंत्यस्काराच्या ठिकाणी घेऊन जाण्याची वेळ आली.

हेही वाचा: विमानात बसले तेव्हा १८८ जण निगेटिव्ह; उतरले तेव्हा ५२ जणांना कोरोना

एका 50 वर्षीय महिलेमध्ये काही दिवसांपासून कोरोनाची लक्षणे दिसून येत होती. तिने कोविड-19 चाचणी केली होती आणि अहवालाची वाट पाहात होती. पण, अहवाल येण्याआधीच तिचा मृत्यू झाला. मंडासा मंडल गावातील रहिवाशी असणाऱ्या महिलेची प्रकृती बिघडल्याने सोमवारी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. पण, तिची प्रकृती अधिक बिघडत गेली आणि त्यातच तिचा मृत्यू झाला. 'India Today'ने यासंदर्भातील वृत्त दिलंय.

कुटुंबियांनी महिलेच्या अंत्यसंस्कारासाठी अ‍ॅम्बुलन्स किंवा इतर वाहन मिळवण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना कोणतेही वाहन मिळाले नाही. कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने अ‍ॅम्बुलन्सची उपलब्धता नव्हती. अशावेळी महिलेच्या मुलाने टू-व्हीलरवरुनच आपल्या आईला अंत्यसंस्कारासाठी गावी घेऊन जाण्याचा निर्णय घेतला. महिलेला टू-व्हिलरवरुन घेऊन जाणाऱ्या मुलाला पोलिसांनी पाहिलं. पोलिसांनी अडवून चौकशी केल्यानंतर घडला प्रकार समोर आला.

loading image