मरण पावलेल्या व्यक्तीचा मृतदेह वर्षभर ठेवला घरात; कोमात असल्याचा केला बनाव; आता... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Crime

मरण पावलेल्या व्यक्तीचा मृतदेह वर्षभर ठेवला घरात; कोमात असल्याचा केला बनाव; आता...

नवी दिल्ली - एका विचित्र घटनेत वर्षभरापूर्वी मरण पावलेल्या व्यक्तीचा मृतदेह त्याच्या कुटुंबीयांनी वर्षभराहून अधिक काळ घरी ठेवला होता. हा प्रकार उघडकीस आल्यानंतरही मृताच्या कुटुंबीयांनी जीवंत असल्याचे सांगत मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यास नकार दिला. (Crime news in Marathi)

हेही वाचा: Congress: काँग्रेस नेते पुन्हा रडारवर! 'नॅशनल हेराल्ड' प्रकरणी नेत्यांना ईडीची नोटीस

उत्तर प्रदेशातील कानपूरमधील रोशन नगर परिसरात ही घटना घडली आहे. मृताचा मृतदेह दीड वर्षापासून घरात ठेवल्याची माहिती प्रशासनाला मिळाली होती. त्यानंतर पोलिसांसह आरोग्य विभागाचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि मृतदेह तपासणीसाठी वैद्यकीय महाविद्यालयात पाठवण्यात आला. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार मृतदेहाचे ममी करण्यात आला होते. तसेच मृतदेह कपड्यात घट्ट गुंडाळलेला होता.

रोशन नगर रहिवासी विमलेश आयकर विभागात काम करत होते. एप्रिल 2021 मध्ये त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारा सुरु असताना त्यांचा मृत्यू झाला होता. कुटुंबातील सदस्यांना मृत्यू प्रमाणपत्र देखील देण्यात आले होते. त्यानंतर, कुटुंबातील सदस्य अंत्यसंस्काराच्या तयारीत असताना, अचानक मृतदेहाला शुद्ध आल्याचा दावा करण्यात आला होता. त्यानंतर मृत व्यक्ती कोमात असल्याचं कुटुंबीयांनी सांगितलं होतं.

हेही वाचा: महिला अत्याचाराच्या गुन्हेगारांना मिळणार नाही जामीन; यूपी सरकारनं केला कायदा

दरम्यान या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी करणारे पत्र मुख्यमंत्री कार्यालयाला पाठवण्यात आल्याने संपूर्ण प्रकरण उघडकीस आले. त्यानंतर आझमगड पोलिसांसह आरोग्य विभागाची टीम मृत व्यक्तीच्या घरी पोहोचली. यावेळी मृताच्या कुटुंबीयांनी तो जिवंत असल्याचा दावा केला होता.

विमलेशच्या वडिलांनी सांगितले की, “एप्रिल २०२१ मध्ये तो आजारी होता म्हणून आम्ही त्याला रुग्णालयात नेले होते. जेथे त्याला मृत घोषित करण्यात आले. पण जेव्हा आम्ही त्याला घरी आणले तेव्हा आमच्या लक्षात आले की तो जीवंत आहे. त्याच्या हृदयाची धडधड देखील सुरू होती. त्यामुळे आम्ही त्याला जाळले नाही. ते शेवटपर्यंत मुलगा जीवंत असल्याचा दावा करत होते.

Web Title: Family Keeps Corpse Of Man Who Died A Year Ago

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Uttar PradeshCrime News