काँग्रेस नेते पुन्हा रडारवर! 'नॅशनल हेराल्ड' प्रकरणी नेत्यांना ईडीची नोटीस | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Rahul Gandhi

Congress: काँग्रेस नेते पुन्हा रडारवर! 'नॅशनल हेराल्ड' प्रकरणी नेत्यांना ईडीची नोटीस

नवी दिल्ली : काँग्रेस पक्षाच्या मालकीच्या नॅशनल हेराल्ड वृत्तपत्राशी संबंधित कथित मनी लाँड्रिंगच्या चौकशी संदर्भात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) तेलंगणा आणि आंध्र प्रदेशमधील काही काँग्रेस नेत्यांना नोटीस बजावली आहे. अधिकाऱ्यांनी शुक्रवारी ही माहिती दिली. (Congress news in Marathi)

हेही वाचा: Rahul Gandhi : "राहुल गांधी नैसर्गिक नेते त्यांना कुठल्याही पदाची गरज नाही"

काँग्रेस पक्षाच्या काही नेत्यांना पुढील काही आठवड्यांत चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे, तर काहींना यंग इंडियाला दिलेल्या देणग्यांबाबत नोटीस बजावण्यात आली आहे. आतापर्यंत चार नेत्यांना नोटिसा बजावण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.

या आठवड्याच्या सुरुवातीला कर्नाटक काँग्रेसचे अध्यक्ष डीके शिवकुमार यांनी दिल्लीत ईडीने त्यांची चौकशी केल्याचे सांगितलं होते. त्यांनी यापूर्वी कंपनीसोबत केलेल्या काही व्यवहारांबद्दल त्यांची चौकशी करण्यात आली होती. ईडीने शिवकुमार आणि त्यांच्या भावाकडून यंग इंडियाला दिलेल्या देणग्यांबाबत चौकशी केली होती.

हेही वाचा: नितीश कुमार कधीही काँग्रेसच्या मांडीवर जावून बसतील; शहांचा लालूंना सूचक इशारा

शिवकुमार म्हणाले की त्यांनी एजन्सीकडे त्यांच्या मालमत्तेचा तपशील देण्यासाठी आणखी वेळ मागितला आहे. नॅशनल हेराल्ड मनी लाँडरिंग प्रकरणात, काही महिन्यापूर्वी ईडीने काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि त्यांचे पुत्र खासदार राहुल गांधी यांच्यासह काही काँग्रेस नेत्यांची चौकशी केली होती.

Web Title: Ed Notice To Congress Leaders In National Herald Case

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..