मंदिरासाठी जमीन न दिल्याने कुटुंबावर बहिष्कार, शुद्धीकरणासाठी गोमूत्र पिण्याची सक्ती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ghosi Family

मंदिरासाठी जमीन न दिल्याने कुटुंबावर बहिष्कार, शुद्धीकरणासाठी गोमूत्र पिण्याची सक्ती

भोपाळ : मंदिरासाठी संपूर्ण जमीन दान करण्यासाठी नकार दिल्याने एका कुटुंबावर कथितरित्या बहिष्कार टाकण्यात आला. मध्य प्रदेशातील गुना (Guna Madhya Pradesh) जिल्ह्यात ही घटना घडली असून स्थानिक पंचायतीने या कुटुंबावर बहिष्कार टाकला आहे. या कुटुंबाने जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली असून सध्या या प्रकरणाची चौकशी सुरू आहे.

हेही वाचा: सलमान खान लसीकरणासाठी जनजागृती करणार? राजेश टोपेंची माहिती

हिरालाल घोसी हे गुना येथील शिवाजी नगर येथील रहिवासी आहेत. ''त्यांना मंदिरासाठी जमीन दान करण्यास पंचायतन सांगितले होते. त्यांनी जमीनीचा काही भाग दान केला. मात्र, पंचायतीला घोसी यांची संपूर्ण जमीन पाहिजे होती. त्यासाठी नकार दिल्याने त्यांच्या कुटुंबावर बहिष्कार टाकण्यात आला. समाजातील सर्वांना आमच्या घरी येण्या-जाण्यास बंदी घालण्यात आली. तसेच आमच्या कुटुंबातील सदस्यांसोबत कोणीही लग्न करू नये, असं समाजातील लोकांना सांगण्यात आले. पंचायत हा आदेश देत असताना घोसी यांनी आपल्या फोनवर रेकॉर्डींग केली. त्यामुळे पंचायत सदस्य आणखी संतापले. त्यानंतर जमिनीचा तुकडा दान करण्याव्यतिरिक्त त्यांच्या कुटुंबीयांना शुद्धीकरणासाठी गोमूत्राचे सेवन करण्यास सांगितले. तसेच डोक्यावरून जाडे-चपला वाहण्यास सांगून कुटुंबप्रमुखाला दाढी करण्यास सांगितले'', असा आरोप घोसी यांनी केला आहे. याबाबत त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे. याबाबत इंडिया टुडेने वृत्त दिले आहे.

"संपूर्ण वाद माझ्या मालकीच्या जमिनीवरून आहे. मी मंदिराच्या बांधकामासाठी माझ्या जमिनीचा काही भाग आधीच दान केला आहे. परंतु, त्यांना संपूर्ण जमीन हवी आहे ज्यामुळे आम्ही भूमिहीन होऊ'', असे घोसी यांनी सांगितले. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना विचारले असता, त्यांनी तक्रार प्राप्त झाल्याचे सांगितले. तसेच याप्रकरणी चौकशीचे आदेश देण्यात आले असून तक्रार खरी असल्यास कायद्यानुसार योग्य ती कारवाई केली जाईल, असे जिल्हाधिकारी फ्रँक नोबेल यांनी सांगितले.

loading image
go to top