सलमान खान लसीकरणासाठी जनजागृती करणार? राजेश टोपेंची माहिती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Salman Khan

सलमान खान लसीकरणासाठी जनजागृती करणार? राजेश टोपेंची माहिती

मुंबई : अधिकाअधिक लोकांना लसीकरण (Vaccination) व्हावे यासाठी प्रयत्न सुरू आहेत. प्रसिद्ध व्यक्तींना सोबत घेऊन लसीकरणाबाबत जनजागृती (vaccination awareness) करण्यात येणार असून त्यासाठी सलमान खानसारख्या (Salman Khan) सेलिब्रिटींना पुढे आणण्यासाठी चर्चा सुरू आहे. याबाबत स्वतः राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी माहिती दिली. ते एएनआयसोबत बोलत होते.

हेही वाचा: लसीकरण वाढीसाठी आता अधिकारी तालुका मुक्कामी

येत्या फेब्रुवारी महिन्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तविली जात आहे. गेल्या दोन लाटेत महाराष्ट्रात ज्याप्रमाणे कोरोनाने धुमाकूळ घातला होता त्याचा विचार करत सध्या लसीकरणाचा वेग वाढविणे गरजेचे आहे. त्यासाठी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांची भेट घेतली. कोविड लसीकरण जलद गतीने करण्याच्या दृष्टीने कोविशिल्डच्या दोन डोसमधील अंतर 84 दिवसावरुन 28 दिवसांपर्यंत करता येईल का? याचा फेरविचार करावा, असं राजेश टोपे यांनी मांडविया सुचविले. तसेच त्यांनी तिसऱ्या लाटेचा विचार करता धार्मिक नेते, प्रसिद्ध व्यक्तींद्वारे लसीकरणाबाबत जनजागृती करणार आहोत. जनजागृती मोहिमेसाठी सलमान खानसारख्या सेलिब्रिटीची मदत घेणार आहोत, अशी माहिती राजेश टोपे यांनी एएनआयसोबत बोलताना दिली.

सध्या महाराष्ट्रात कोरोना रुग्णांचा मृत्यूदर २.१२ इतका असून काल ६८६ रुग्णांची नव्याने नोंद झाली आहे. तसेच १९ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या राज्यात ९९८५९ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत, तर १०१६ व्यक्ती हे संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहे. तसेच आतापर्यंत ६४ लाख ६८ हजार ७९१ लोकांना कोरोनाची बाधा झालेली आहे.

loading image
go to top