Hathras: भीतीपोटी पीडितेचे कुटुंबिय सोडणार गाव

सकाळ ऑनलाईन टीम
Thursday, 1 October 2020

उत्तर प्रदेशातील हाथरस या गावात झालेली सामूहिक बलात्काराने पुन्हा एकदा महिलांच्या सुरक्षेचा  प्रश्न ऐरणीवर आला आहे. या क्रूर घटनेने भारतातील महिला या सुरक्षित नसल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.

हाथरस :  हाथरसमधील पिडीतेचे कुंटुबीय सध्या खुपच भेदरल्या अवस्थेत आहे. "आमच्यासोबत काहीही घडू शकतं, आम्हाला इथं सुरक्षित वाटत नाही. त्यामुळे आमचा गाव सोडण्याचा विचार आहे,” असं हाथरसमधील पीडितेच्या भावानं म्हटलं आहे. याबाबतचं वृत्त इंडिया टुडेनं दिलं आहे.

पिडितेचा भावाने पोलिसांवर आणि प्रशासनावर विश्वास नसल्याचेही सांगितले आहे. आम्हाला ते लोक जीवंत सोडणार नाहीत. त्यामुळे आम्ही आता गावही सोडण्याच्या विचारात आहोत. तसेच आमचा राजकारण्यांवरही विश्वास नाही, असंही पिडितेचा भाऊ म्हणाला.

केंद्राच्या ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ या मोहिमेवरही पिडितेच्या भावाने भाष्य केलं असून “ या पध्दतीने मुलींवर सामुहिक अत्याचार करुन त्यांना मारलं जात असेल तर मुलींना शिकवायचं कसं?” असा प्रश्नही त्याने केला आहे. अत्याचार करणाऱ्या चौघांनाही अटक व्हावी आणि फाशीचीच शिक्षा दिली जावी. या आरोपींना वाचवण्याचे प्रयत्न सुरु आहे याची आम्हाला खात्री आहे. प्रकरणाची सीबीआय चौकशी देखील व्हायला हवी,” अशी मागणीही पीडितेच्या भावाने बोलताना केली. 

हाथरसला जाण्यापासून प्रियांका गांधींना अडवण्यासाठी पोलिस बंदोबस्त; कलम 144 लागू

उत्तर प्रदेशातील हाथरस या गावात झालेली सामूहिक बलात्काराने पुन्हा एकदा महिलांच्या सुरक्षेचा  प्रश्न ऐरणीवर आला आहे. या क्रूर घटनेने भारतातील महिला या सुरक्षित नसल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. पीडीतेवर करण्यात आलेले दुष्कर्म हे इतके भयानक आहेत की ते माणूसकीला काळीमा फासणारे होते.

उत्तरप्रदेशातील या पीडीतेला उपचारांसाठी दिल्लीला नेण्यात आलं होतं. तिथे उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. तिच्या मृत्यूनंतर पोलिसांनी तीचा मृतदेह परिवाराकडे सुपुर्द न करता त्यावर कोणत्याही रितीरिवाजाशिवाय त्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. पोलिसांनी केलेल्या या कृत्याबद्दल संताप व्यक्त होत आहे. 

हे वाचा - हाथरसची घटना म्हणजे देशावरील न पुसला जाणारा डाग ; अभिनेता फरहान अख्तरची उद्विग्नता

याआधी जेव्हा मृतदेह गावात आणला गेला तेंव्हा तो कुटुंबियांकडे सोपवला गेला नाही. कुटुंबियांनी अक्षरश: ऍम्ब्यूलन्ससमोर पडून आपला आक्रोश व्यक्त केला. यादरम्यानच एसडीएमवर कुटुंबियांसोबत गैरवर्तन केल्याचा आरोप लावला गेला. यानंतर पोलिस आणि गावकऱ्यांमध्ये झटापटी झाली होती.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: family of victim in hathras are in fear palning to leave village